पंतप्रधान कार्यालय
जपानमधील सुप्रसिद्ध शोरिन्झान दारुमा-जी मंदिराचे प्रमुख पुजारी सेशी हिरोसे यांच्याकडून पंतप्रधानांना दारुमा बाहुली भेट
प्रविष्टि तिथि:
29 AUG 2025 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज जपानमधील सुप्रसिद्ध ताकासाकी-गुन्मा येथील शोरिन्झान दारुमा-जी मंदिराचे प्रमुख पुजारी सेशी हिरोसे यांनी दारुमा बाहुली भेट दिली. या विशेष भेटीमुळे भारत आणि जपानमधील घनिष्ठ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत .
जपानी संस्कृतीत दारुमा बाहुली ही शुभ आणि उत्तम भाग्याचे प्रतीक मानले जाते. गुन्मामधील ताकासाकी शहर हे या प्रसिद्ध दारुमा बाहुल्यांचे मूलस्थान आहे. जपानमधील दारुमा परंपरा ही बोधिधर्म नावाच्या कांचीपुरम येथील भारतीय भिक्षूच्या वारशावर आधारित आहे. जपानमध्ये ते दारुमा दाइशी नावाने ओळखले जातात. ते हजार वर्षांपूर्वी जपानमध्ये आले होते, असे सांगितले जाते.
सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2161952)
आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam