पंतप्रधान कार्यालय
जपान आणि चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
Posted On:
28 AUG 2025 10:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून, मी 15 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.
माझ्या भेटीदरम्यान, आम्ही आमच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीतील पुढील टप्प्याला आकार देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्यामुळे गेल्या अकरा वर्षांत स्थिर आणि महत्त्वपूर्ण प्रगती केली गेली आहे. आम्ही आमच्या सहकार्याला नवी उंची गाठून देण्याचा, आमच्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांची व्याप्ती आणि महत्त्वाकांक्षा वाढवण्याचा, त्याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा आणि सेमीकंडक्टरसह नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करू. ही भेट म्हणजे,आमच्या लोकांना जोडण्याबरोबरच आपल्या नागरी सभ्यतेविषयीचे बंध आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याची संधी देखील असणार आहे.
जपान भेटीनंतर,मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून तियानजिनमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जाणार आहे. भारत हा ‘एससीओ’चा सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे. आमच्या अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही नवीन कल्पना सादर केल्या आहेत; आणि नवोन्मेषी कल्पना , आरोग्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रात सहकार्य सुरू केले आहे. सामायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ‘एससीओ’ सदस्यांसोबत काम करण्यास भारत वचनबद्ध आहे. शिखर परिषदेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इतर नेत्यांना भेटण्यास मी उत्सुक आहे.
मला विश्वास आहे की, जपान आणि चीनच्या दौऱ्यामुळे आपले राष्ट्रीय हित आणि प्राधान्यक्रमाना गती मिळेल आणि प्रादेशिक आणि जागतिक शांतता, सुरक्षा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी फलदायी सहकार्य निर्माण होण्यास हातभार लागेल.
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161721)
Visitor Counter : 53