पंतप्रधान कार्यालय
पालघरमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
28 AUG 2025 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे निवासी इमारत कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला असून काहीजण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स हँडलवरच्या संदेशात म्हटले आहे :
“महाराष्ट्रातील पालघर येथे इमारत कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले. या कठीण काळात आपले प्रियजन गमावलेल्यांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून बाधितांना शक्य ती सर्व मदत पुरविली जात आहे : पंतप्रधान @narendramodi”
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2161716)
Visitor Counter : 20