पंतप्रधान कार्यालय
किंड्रिल कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्रोएटर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2025 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2025
किंड्रिल या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्रोएटर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी या जागतिक भागीदारांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना भारतातील प्रचंड संधींचा शोध घेण्यासाठी तसेच अभिनव संशोधन आणि उत्कृष्टतेसाठी देशातील प्रतिभावंत युवा वर्गासोबत एकत्र येऊन काम करण्यासाठी आमंत्रित केले.
अशा भागीदारींच्या माध्यमातून केवळ भारताला लाभदायक ठरणारेच नव्हे तर जागतिक प्रगतीमध्ये देखील योगदान देणारे उपक्रम उभारता येतील यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.
मार्टिन श्रोएटर यांनी एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणतात;
“मार्टिन श्रोएटर यांची भेट खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी होती. भारतातील प्रचंड संधींचा शोध घेण्यासाठी तसेच अभिनव संशोधन आणि उत्कृष्टतेसाठी देशातील प्रतिभावंत युवा वर्गासोबत एकत्र येऊन काम करण्यासाठी भारत जागतिक भागीदारांचे मनापासून स्वागत करत आहे.
आपण एकत्र येऊन केवळ भारताला लाभदायक ठरणारेच नव्हे तर जागतिक प्रगतीमध्ये देखील योगदान देणारे उपक्रम उभारु शकतो.”
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2159574)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Malayalam
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada