पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय राजधानी प्रदेशात नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याकरिता पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
Posted On:
16 AUG 2025 8:43PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय राजधानी प्रदेशात (एन सी आर ) पायाभूत सुविधा विकासाला मोठी चालना देऊन नागरिकांची ‘ईज ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन सुलभता सुधारण्यासाठी सरकारची ठाम वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
डीडीन्यूजने ‘एक्स’ या समाज माध्यमावर केलेल्या एका संदेशाला उत्तर देताना मोदी म्हणाले की,
‘राष्ट्रीय राजधानी प्रदेशात पायाभूत सुविधांना चालना ही नागरिकांच्या ‘जीवन सुलभता’ सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे’.
***
निलिमा चितळे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2157229)