पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते, उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत 11,000 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग प्रकल्पांचे होणार उद्घाटन


द्वारका एक्सप्रेसवेच्या दिल्ली विभागाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान एनसीआरमधील नागरी विस्तार रस्ता क्रमांक-II प्रकल्पाचे देखील करणार उद्घाटन

या प्रकल्पांमुळे बहुविध संपर्क व्यवस्था तयार होण्यास आणि दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यास होणार मदत

Posted On: 16 AUG 2025 11:15AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथून सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.

दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागातील दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करत, प्रवासाचा वेळ आणि रहदारी कमी करण्यासाठी, तसेच दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकार करत असलेल्या व्यापक योजनेअंतर्गत द्वारका एक्सप्रेसवेचा दिल्लीतून जाणारा मार्ग आणि शहरी विस्तार रस्ता-II (UER-II) हे प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब, हे उपक्रम दर्शवितात ज्यामुळे वाहतूक सुरळीतपणे होऊन राहणीमानात सुधारणा होते आणि गतिशीलता सुनिश्चित होते.

द्वारका एक्सप्रेसवेचा 10.1 किमी लांबीचा दिल्ली विभाग सुमारे 5,360 कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे यशोभूमी, डीएमआरसी ब्लू लाईन आणि ऑरेंज लाईन, नियोजित बिजवासन रेल्वे स्थानक आणि द्वारका क्लस्टर बस डेपोला या विभागांत बहुविध वाहतूक व्यवस्था देखील निर्माण होईल. या विभागात पुढील मार्ग समाविष्ट आहेत:

  • पहिला टप्पा I: शिवमूर्ती चौकापासून द्वारका सेक्टर-21 येथील अंडर ब्रिज (RUB) पर्यंतचा 5.9 किमीचा मार्ग.
  • दुसरा टप्पा II: द्वारका सेक्टर-21RUB पासून दिल्ली-हरियाणा सीमेपर्यंत 4.2 किमी. जो शहरी विस्तार रोड-क्रमांक II सोबत जोडला जाईल

द्वारका एक्सप्रेसवेच्या 19 किमी लांबीच्या हरियाणातून जाणाऱ्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी मार्च 2024 मध्ये केले होते.

सुमारे 5,580 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या, बहादूरगड आणि सोनीपतला जोडणाऱ्या नवीन रस्त्यांसह अर्बन एक्सटेंशन रोड-2 (UER-II) च्या अलीपूर ते दिचाओं कलान या भागाचे उदघाटन देखील पंतप्रधान करतील. यामुळे दिल्लीअंतर्गत आणि शहराबाहेरील रिंगरोड आणि मुकरबा चौक, धौला कुआं आणि NH-09 सारख्या वर्दळीच्या ठिकाणची वाहतूक सुलभ होईल. या नवीन रस्त्यांमुळे बहादूरगड आणि सोनीपतला थेट जाता येईल, औद्योगिक दळणवळण सुधारेल, शहरातील वाहतूककोंडी कमी होईल आणि एनसीआरमधील माल वाहतूक अधिक वेगवान होईल.

***

सोनल तुपे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2157126)