माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तीन दिवस चालणाऱ्या हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला देशभरात प्रारंभ, भारताचे स्वातंत्र्य आणि ऐक्य यांच्या चित्रपटीय कथांचे सादरीकरण


शहीद आणि स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटांद्वारे महोत्सवाची सुरुवात; त्यापाठोपाठ राष्ट्रीय चित्रपट महामंडळाने पुनरुज्जीवित केलेल्या अभिजात आणि समकालीन देशभक्तीपर चित्रपटांच्या खजिन्यासह उरी, आरआरआर, तान्हाजी आणि मेजर हे चित्रपट होणार सादर

हर घर तिरंगा अभियानाच्या विस्ताराचा भाग म्हणून चित्रपट तारे-तारकांच्या सहभागासह मुंबई, पुणे, दिल्ली आणि चेन्नई येथे महोत्सवाचा भव्य शुभारंभ

“चित्रपटांच्या माध्यमातून भारताचा समृध्द सांस्कृतिक इतिहास आणि वारसा यांचे दर्शन घडवणे हा या हर घर तिरंगा देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे” – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू

Posted On: 11 AUG 2025 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2025 

 

भारतीय स्वातंत्र्याला देशव्यापी चित्रपटीय आदरांजली वाहणाऱ्या तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा- देशभक्तीपर चित्रपट महोत्सवा’ची आज उत्कंठावर्धक प्रतिसादासह सुरुवात झाली. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 या कालावधीतल्या  या महोत्सवाचे आयोजन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) केले आहे.

हा महोत्सव म्हणजे राष्ट्रीय ध्वजाशी प्रत्येक नागरिकाचे असलेले भावनिक नाते आणखी दृढ करण्याच्या आणि त्यांच्या ऐक्य तसेच राष्ट्रभक्तीची भावना पुन्हा नव्याने बिंबवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या हर घर तिरंगा अभियानाचा विस्तारित भाग आहे. अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाद्वारे हा महोत्सव प्रेक्षकांना भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रवासाचे स्मरण करून देत, असंख्य वीरांचा  त्याग आणि भारताच्या प्रतिमेला आकार देणाऱ्या कहाण्यांचे सादरीकरण करतो.

या महोत्सवानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू म्हणाले की चित्रपटांच्या माध्यमातून भारताचा समृध्द सांस्कृतिक इतिहास आणि वारसा यांचे दर्शन घडवणे हा या हर घर तिरंगा देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे. चित्रपट हे दृश्य माध्यम असल्यामुळे प्रेक्षकांवर त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो आणि म्हणून सर्व भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग  चेतवणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे असे जाजू यांनी सांगितले.

अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने देखील या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. या  उपक्रमाचा भाग होणे ही सन्मानाची बाब आहे असे ती म्हणाली. “हे चित्रपट आपल्याला आपल्या लोकांची लवचिकता आणि धैर्य यांची आठवण करून देतात आणि आपण  या कथा सामायिक करणे सुरु ठेवणे महत्त्वाचे आहे,”ती पुढे म्हणाली.

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुणे येथे उद्घाटन समारंभाचे आयोजन

चार शहरांमध्ये भव्य उद्घाटन समारंभ

  • नवी दिल्ली: एनएफडीसी-सिरी फोर्ट सभागृहात दिल्लीचे  कला, संस्कृती आणि भाषा मंत्री  कपिल मिश्रा यांच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले.
  • मुंबई: एनएफडीसी-नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) संकुलामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव  संजय जाजू आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी  वरिष्ठ अधिकारी, चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमी उपस्थित होते, त्यामुळे तीन दिवसांच्या प्रेरणादायी चित्रपट प्रदर्शनांचा रंगतदार सूर तयार झाला.
  • चेन्नई: टागोर फिल्म सेंटरच्यावतीने  उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी दिग्दर्शक वसंत, नृत्यदिग्दर्शक कला मास्टर, चोझा नाचियार, अभिनेत्री नमिता, उपस्थित होत्या.
  • पुणे: पुण्यामध्‍ये एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) येथील प्रेक्षकांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथून उद्घाटन समारंभांचे थेट प्रक्षेपण अनुभवले.त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन सुरू झाले.ज्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत एकता आणि सामायिक उत्सवाची भावना निर्माण झाली.

वैविध्यपूर्ण आणि प्रेरणादायी चित्रपटांची मालिका

विविध चित्रपटांच्या मालिकेत खालील दिग्गजांच्या  देशभक्तीपर चित्रपटांचा समावेश आहे:

  • शहीद (1965)- शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची रोमहर्षक कथा.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर (2024) – स्वातंत्र्यसेनानी  विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन आणि त्यांच्या विचारसरणीचे दर्शन.
  • उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2019) - 2016 मध्‍ये   भारतीय सैन्याने केलेल्या  सर्जिकल स्ट्राइकचे आधुनिक स्वरूपातील कथन .
  • आरआरआर (2022) – स्वातंत्र्यसैनिकांच्या काल्पनिक कथांद्वारे प्रेरित एक महाकाव्य कृती नाट्यपट
  • तान्हाजी (2020) – मराठा योद्धा तानाजी  मालुसरे यांची शौर्यगाथा.

इतर पुढील लक्षणीय चित्रपटांचेही केले जाणार प्रदर्शन:

  • मेजर (2022)- 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहणारा चित्रपट
  • नेताजी सुभाषचंद्र बोस – द्रष्टे  राष्ट्रवादी नेते असलेल्या या थोर नेत्याची  माहिती देणारा  एक  लघुपट.
  • वीरपांडिया कट्टाबोमन (1959)- दक्षिण भारतातील महान स्वातंत्र्यसैनिकावरील तमिळ ‘अभिजात चित्रपट
  • क्रांती (1981)- वसाहतवादी राजवटीविरुद्ध बंडाची एक भव्य कथा.
  • हकीकत (1964)- 1962  च्या भारत-चीन संघर्षाच्या घटनेवरून  प्रेरित एक युद्ध नाट्य .
  • परासख्ती (1952)- मजबूत सामाजिक आणि राष्ट्रवादी संकल्पना  असलेला एक ऐतिहासिक तमिळ चित्रपट.
  • सात हिंदुस्तानी (1969) – गोव्याच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या सात भारतीयांची कहाणी.

याव्यतिरिक्त, महोत्सवात शैक्षणिक माहितीपट सादर करण्‍यात येत आहेत, त्यांना  ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे प्रेक्षकांच्या दृष्‍टीने ते  लक्षवेधी ठरत आहेत.

  • अवर फ्लॅग- तिरंगा ध्वजाची  प्रतीकात्मकता आणि इतिहास जाणून घेणे.
  • लोकमान्य टिळक - बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाचा आणि त्यांनी  केलेल्या राजकीय जागृतीचा आढावा.
  • टिळक - टिळकांच्या राष्ट्रवादी दृष्टिकोनाचे  सूक्ष्म रेखाटन .
  • शहादत - भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानाच्या कथांवर प्रकाश.

एनएफएआय द्वारे पुनर्संचयित क्लासिक्स - भूतकाळाला नवसंजीवनी 

महोत्सवातील चार महत्त्वाचे चित्रपट - क्रांती (1981), हकीकत (1964), सात हिंदुस्तानी (1969) आणि शहीद (1965) - हे चित्रपट त्यांच्या डिजिटली पुनर्संचयित आवृत्त्यांमध्ये सादर केले जातील. या चित्रपटांच्या डिजिटल पुनर्संचयनासाठी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह (एनएफएआय) या संस्थेने परिश्रम घेतले आहेत.

पुनर्संचयनात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह (एनएफएआय) संस्थेची भूमिका:

एनएफडीसी चा एक विभाग असलेला भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह, ही संस्था चित्रपटांचे जतन आणि पुनर्संचयन करण्यात आघाडीवर आहे. यामुळे भारताचा चित्रपटांचा वारसा काळाच्या ओघात नष्ट होऊ नये याची सुनिश्चिती  होते. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रह ही संस्था प्रगत डिजिटायझेशन तंत्रे, रंग सुधारणा आणि ध्वनी संवर्धनाद्वारे जुने आणि नाजूक सेल्युलॉइड प्रिंट्स जवळजवळ मूळ गुणवत्तेत पुनर्संचयित केले जातात, ज्यामुळे नवीन पिढीतील प्रेक्षकांना हे क्लासिक्स चित्रपट ते जणू मूळ स्वरूपात पाहत आहेत असा अनुभव येतो. हर घर तिरंगा - देशभक्तीपर चित्रपट महोत्सवात या पुनर्संचयित आवृत्त्यांचा समावेश हा चित्रपट निर्मात्यांचा केलेला सन्मान आहे आणि भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहाच्या भारताच्या चित्रपट वारशाची जपणूक करण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे.

महोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक - सर्व शहरे (11-13 ऑगस्ट 2025)

संपूर्ण हर घर तिरंगा - देशभक्तीपर चित्रपट महोत्सव कार्यक्रमाची शहरनिहाय, दैनंदिन सारणी खाली दिली आहे. ज्या शहरात एकाच वेळी एकापेक्षा अधिक प्रेक्षागृहात चित्रपट दाखवले जातील त्यासाठी दुसरे किंवा पर्यायी प्रेक्षागृह दाखवले आहे.

मुंबई – एनएफडीसी/एनएमआयसी संकुल, पेडर रोड. 

दिनांक

स्थळ

वेळ

कार्यक्रम

11 ऑगस्ट 2025 (उद्घाटन दिवस)

मुख्य सभागृह

सकाळी 11:00 ते 11:30

उद्घाटनपर कार्यक्रम

 

मुख्य सभागृह

सकाळी 11:30 ते 12:00

 

स्थानिक उद्घाटनपर कार्यक्रम (श्रिया पिळगावकर)

 

मुख्य सभागृह

 दुपारी 12 ते  12:30

 

माहितीपट लोकमान्य टिळक

 

मुख्य सभागृह

दुपारी 12:30 ते 3:30

 

शहीद

 

मुख्य सभागृह

सायंकाळी 4:00 ते 7:00

 

स्वातंत्र्यवीर सावरकर

12 ऑगस्ट 2025 (दुसरा दिवस)

मुख्य सभागृह

सकाळी 11:00 ते 11:20

 

अवर फ्लॅग (माहितीपट) 

 

मुख्य सभागृह

सकाळी 11:20 ते 2:00

 

ऊरी : द सर्जिकल स्ट्राइक 

 

स्क्रिनिंग रूम (सेकंडरी)

दुपारी 2:30 ते 2:40

नेताजी सुभाषचंद्र बोस (लघु माहितीपट)

 

मुख्य सभागृह

दुपारी 2:40 ते 5:10

 

मेजर

 

मुख्य सभागृह

सायंकाळी 5:30 ते 6:00

 

शहादत (माहितीपट) 

 

स्क्रिनिंग रूम (सेकंडरी)

सायंकाळी 6:00 ते 9:00

क्रांती (पॅरलल स्क्रीनिंग)

13 ऑगस्ट 2025 (अंतिम दिवस)

मुख्य सभागृह

सकाळी 11:00 ते 1:15

 

तानाजी

 

मुख्य सभागृह

दुपारी 2:00 ते 5:30

 

आरआरआर

 

मुख्य सभागृह

सायंकाळी 6:00 ते 8:30

सात हिंदुस्तानी

 

पुणे – एनएफडीसी आणि एनएफएआय (विधी महाविद्यालय मार्ग)

दिनांक

स्थळ

वेळ

कार्यक्रम

11 ऑगस्ट 2025 (उद्घाटन दिवस)

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सकाळी 11:00 ते 11:30

उद्घाटनपर कार्यक्रम

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सकाळी 11:30 ते 2:00

शहीद एनएफएआय प्रेक्षागृह

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सायंकाळी 4:00 ते 7:00

स्वातंत्र्यवीर सावरकर एनएफएआय प्रेक्षागृह

12 ऑगस्ट 2025 (दुसरा दिवस)

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सकाळी 11:00 ते 11:20

अवर फ्लॅग (माहितीपट) 

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सकाळी 11:20 ते 2:00

ऊरी : द सर्जिकल स्ट्राइक

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

दुपारी 3:00 ते 3:20

 

नेताजी सुभाषचंद्र बोस (लघु माहितीपट) 

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

दुपारी 3:30 ते 6:30

 

हकीकत 

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सायंकाळी 6:30 ते 7:00

शहादत (माहितीपट) 

13 ऑगस्ट 2025 (अंतिम दिवस)

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सकाळी 11:00 ते 1:15

 

तान्हाजी

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

दुपारी 2:00 ते 2:30

 

टिळक (माहितीपट) 

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

दुपारी 2:30 ते 5:40

 

क्रांती 

 

एनएफएआय प्रेक्षागृह (मुख्य)

सायंकाळी 6:00 ते 8:30

सात हिंदुस्तानी

 

New Delhi — NFDC, Siri Fort Auditorium

Date

Venue / Screen

Time

Event

Aug 11, 2025 (Opening Day)

Main Hall (Audi-2)

11:00 AM – 11:30 AM

Opening Ceremony

 

Main Hall (Audi-2)

12:30 PM – 3:30 PM

Shaheed

 

Main Hall (Audi-2)

4:00 PM – 7:00 PM

Swatantrya Veer Savarkar

Aug 12, 2025 (Day 2)

Main Hall (Audi-2)

11:00 AM – 11:20 AM

Documentary — Our Flag

 

Main Hall (Audi-2)

11:20 AM – 2:00 PM

Uri: The Surgical Strike

 

Main Hall (Audi-2)

2:30 PM – 2:40 PM

Netaji Subhash Chandra Bose (short documentary)

 

Main Hall (Audi-2)

2:40 PM – 5:10 PM

Major

 

Screening Room (Secondary)

2:30 PM – 5:40 PM

Kranti (parallel screening)

 

Main Hall (Audi-2)

5:30 PM – 6:00 PM

Documentary — Shahadat

Aug 13, 2025 (Closing Day)

Main Hall (Audi-2)

11:00 AM – 1:15 PM

Tanhaji

 

Main Hall (Audi-2)

2:00 PM – 5:30 PM

RRR

 

Main Hall (Audi-2)

6:00 PM – 8:30 PM

Saat Hindustani

Chennai — Tagore Film Centre

Date

Venue / Screen

Time

Event

Aug 11, 2025 (Opening Day)

Tagore Film Centre (Main)

11:00 AM – 11:30 AM

Opening Ceremony

 

Tagore Film Centre (Main)

12:30 PM – 3:30 PM

Shaheed

 

Tagore Film Centre (Main)

4:00 PM – 7:00 PM

Swatantrya Veer Savarkar

Aug 12, 2025 (Day 2)

Tagore Film Centre (Main)

11:00 AM – 11:20 AM

Documentary — Our Flag

 

Tagore Film Centre (Main)

11:20 AM – 2:00 PM

Uri: The Surgical Strike

 

Tagore Film Centre (Main)

3:00 PM – 3:20 PM

Netaji Subhash Chandra Bose (short documentary)

 

Tagore Film Centre (Main)

3:30 PM – 6:30 PM

Veerapandia Kattabomman

 

Tagore Film Centre (Main)

6:30 PM – 7:00 PM

Documentary — Shahadat

Aug 13, 2025 (Closing Day)

Tagore Film Centre (Main)

11:00 AM – 1:15 PM

Tanhaji

 

Tagore Film Centre (Main)

2:00 PM – 2:30 PM

Documentary — Tilak

 

Tagore Film Centre (Main)

2:30 PM – 5:40 PM

Parasakthti

 

Tagore Film Centre (Main)

6:00 PM – 8:30 PM

Saat Hindustani

 

एनएफडीसीची भूमिका आणि बांधिलकी

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ गेल्या अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि वारसा जतनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकारची प्रमुख चित्रपट संस्था म्हणून, एनएफडीसी केवळ दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रचार करत नाही तर भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहाच्या माध्यमातून देशाच्या चित्रपट वारशाचे रक्षण देखील करते.

हर घर तिरंगा - देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून एनएफडीसी चित्रपट या माध्यमाचा वापर पिढ्या, भाषा आणि प्रांतांना  जोडण्याच्या उद्देशाने एकात्मतेचे बंध निर्माण करण्यासाठी करत आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिक आणि राष्ट्रध्वज यांच्यातील बंध दृढ करण्याच्या  दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यामुळे उत्सव  भारताच्या मूल्यांशी आणि इतिहासाशी जुळला जातो. 

एनएफडीसीचे प्रयत्न हे सुनिश्चित करतात की देशभक्तीच्या कथा - ऐतिहासिक तथ्यावर  आधारित किंवा काल्पनिक कथांद्वारे पुनर्कल्पित असोत - प्रेक्षकांशी सतत संवाद साधत राहतील तसेच पुढच्या पिढीला स्वातंत्र्य आणि एकतेचे आदर्श टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित करतील.

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155265)