पंतप्रधान कार्यालय
जागतिक संस्कृत दिनानित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा, संस्कृत भाषेच्या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
Posted On:
09 AUG 2025 1:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या जागतिक संस्कृत दिनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या. संस्कृतला "ज्ञान आणि अभिव्यक्तीचा कालातीत स्रोत" असे संबोधत, पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांमध्ये संस्कृतचा असलेला कायमस्वरूपी प्रभाव अधोरेखित केला. संस्कृत शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी जगभरातील विद्वान, विद्यार्थी आणि उत्साही/ संस्कृत प्रेमी लोकांच्या समर्पणाचे मोदी यांनी कौतुक केले. गेल्या दशकात, सरकारने संस्कृत शिक्षण आणि संशोधन मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत, जसे की केंद्रीय संस्कृत विद्यापीठे स्थापन करणे, संस्कृत शिक्षण केंद्रे उघडणे, संस्कृत विद्वानांना अनुदान देणे आणि हस्तलिखितांच्या डिजिटायझेशनसाठी ज्ञान भारतम मिशन सुरू करणे यांचा यात समावेश आहे.
X वरील पोस्टच्या मालिकेत, पंतप्रधानांनी लिहिले;
“आज, श्रावण पौर्णिमेला, आपण जागतिक संस्कृत दिन साजरा करतो. संस्कृत हा ज्ञान आणि अभिव्यक्तीचा एक कालातीत स्रोत आहे. त्याचा प्रभाव सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येतो. हा दिवस जगभरातील संस्कृत शिकणाऱ्या आणि लोकप्रिय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा एक प्रसंग आहे."
“गेल्या दशकात, आमच्या सरकारने संस्कृत लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यामध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठे, संस्कृत शिक्षण केंद्रे स्थापन करणे, संस्कृत विद्वानांना अनुदान देणे आणि हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी ज्ञान भारतम मिशन यांचा समावेश आहे. याचा असंख्य विद्यार्थी आणि संशोधकांना फायदा झाला आहे."
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154610)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam