पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
पंतप्रधानांनी गेल्या महिन्यातील ब्राझील भेटीचे केले स्मरण
दोन्ही नेत्यांची व्यापार, तंत्रज्ञान, उर्जा, संरक्षण, कृषी, आरोग्य आणि दोन्ही देशांतील लोकांच्या दरम्यानच्या संबंधांबाबत सहकार्यात वाढ करण्यावर सहमती
या नेत्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबत विचारांची देवाणघेवाण केली
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2025 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनाशियो लुला द सिल्व्हा यांचा दूरध्वनी आला.
पंतप्रधानांनी संभाषणादरम्यान गेल्या महिन्यातील त्यांच्या ब्राझील भेटीचे स्मरण केले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, उर्जा, संरक्षण, कृषी, आरोग्य आणि दोन्ही देशांतील लोकांच्या दरम्यानच्या संबंधांबाबतचे सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी आराखडा निश्चित करण्याबाबत सहमती व्यक्त केली होती.
त्यावेळच्या चर्चेच्या आधारे, आज दोन्ही नेत्यांनी भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबत विचारांची देवाणघेवाण केली.
या नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2153961)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam