पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान दिनांक 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन


परिषदेची संकल्पना : सदाहरित क्रांती, जैव आनंदाचा मार्ग

पंतप्रधान अन्न आणि शांतीसाठी देण्यात येणारा पहिला एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार करणार प्रदान

Posted On: 06 AUG 2025 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी उपस्थितांना ते संबोधितही करतील.

सदाहरित क्रांती, जैव आनंदाचा मार्ग" ही या परिषदेची संकल्पना असून प्रा. स्वामीनाथन यांनी सर्वांना अन्न मिळणे,सुनिश्चित करण्यासाठी आयुष्यभर केलेल्या समर्पणाचे प्रतिबिंब दर्शविते. ही परिषद शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, विकास व्यावसायिक आणि इतर संबंधितांना 'सदाहरित क्रांती'च्या तत्त्वांवर चर्चा करण्याची आणि विचारविनिमय करण्याची एक संधी प्रदान करेल. या परीषदेत जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे  व्यवस्थापन; अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी शाश्वत शेती; हवामान बदलांशी जुळवून घेत आपली लवचिकता मजबूत करणे; शाश्वत आणि समतापूर्ण उपजीविकेसाठी सुयोग्य तंत्रज्ञानाचा वापर; आणि विकासात्मक चर्चांमध्ये तरुण, महिला आणि उपेक्षित समुदायांना सहभागी करून घेणे या  प्रमुख विषयांवर चर्चा होईल.

एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) आणि द वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेस (टीडब्ल्यूएएस) यांनी आपल्याला मिळालेल्या वारशाचा सन्मान करण्यासाठी,अन्न आणि शांतीसाठी एम.एस. स्वामिनाथन पुरस्कार सुरू केले आहेत. यासाठीचा प्रथम वर्षातील पहिला पुरस्कार पंतप्रधान यावेळी  प्रदान करतील. ज्यांनी वैज्ञानिक संशोधन, धोरण विकास, तळागाळातील सहभाग किंवा स्थानिक क्षमता बांधणीद्वारे अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी आणि असुरक्षित आणि उपेक्षित समुदायांसाठी हवामान न्याय, समानता आणि शांतता प्रगत करण्यासाठी उत्कृष्ट योगदान दिले आहे,अशा विकसनशील देशांतील व्यक्तींना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जाईल

 
जयदेवी पुजारी स्वामी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2153014)