वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवेदन

Posted On: 30 JUL 2025 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या द्विपक्षीय व्यापारासंबंधीच्या निवेदनाची सरकारने दखल घेतली आहे. सरकार यासंदर्भातील परिणामांचा अभ्यास करीत आहे.

न्याय्य, संतुलित व परस्परहिताच्या द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात गेले काही महिने वाटाघाटी सुरू आहेत. आम्ही या उद्दीष्टाप्रती बांधील राहिलो आहोत.

भारतीय शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमइ यांच्या  कल्याणाला  प्रोत्साहन आणि त्याचे संरक्षण याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

आपले राष्ट्रहित जपण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना सरकार करेल. जसे ब्रिटनसोबत नुकत्याच झालेल्या सर्वसमावेशक आर्थिक व व्यापारी करारासह इतर व्यापारी करारांबाबतही सरकारने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. 

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2150474)