शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन


धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 4,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे अनावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, कॅम्पसचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमाचा समावेश

Posted On: 29 JUL 2025 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी  धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगजगतातील प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधींसाठी एक उत्तम व्यासपीठ लाभले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मसुदा समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ के कस्तुरीरंगन यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या शिक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.  

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील दूरदृष्टीचे प्रतिबिंब झळकत असून त्यांनी शिक्षणाला भारताच्या विकास यात्रेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. विकसित भारत 2047 च्या दिशेने राष्ट्राची पुढे वाटचाल सुरु असताना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे दिशादर्शक राष्ट्रीय मोहीम म्हणून कार्य करत आहे. गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला धोरणातून प्रत्यक्षात उतरवण्यात केंद्र सरकारला यश आले असून त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून आला आहे आणि ती वर्ग, कॅम्पस आणि समुदायांपर्यंत पोहोचली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले की, “भारतीयत्व  हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (एनईपी 2020) च्या केंद्रस्थानी आहे. वैज्ञानिक शिक्षण, नवोन्मेष, संशोधन, भारतीय ज्ञान प्रणाली आणि भारतीय भाषांवर जोर देणारे हे धोरण शिक्षणाला राष्ट्रनिर्माणाच्या व्यापक उद्दिष्टाशी जोडते.”

   

त्यांनी यावर भर दिला की, “‘विकसित भारत’ ही केवळ एक संकल्पना  नाही तर पंतप्रधान मोदी यांनी दिलेला  एक प्रभावी  कृतीसंकल्प आहे. त्यांच्या मते, एनईपी 2020 हे या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी सर्वात प्रभावी साधन आहे.” सोबतच त्यांनी सर्व संबंधितांना  “प्रत्येक वर्गखोली अर्थपूर्ण शिक्षणाचे केंद्र ठरेल आणि प्रत्येक मुलाचा संभाव्य विकास होईल यासाठी लक्ष केंद्रीत व सक्रिय पावले उचलावीत,” असे आवाहन केले. 

अखिल भारतीय शिक्षण समागम हे  केवळ एक संमेलन नसून विकसित भारत घडविण्याच्या राष्ट्रीय निर्धाराचा सामूहिक अविष्कार आहे, असे प्रधान यांनी सांगितले.  त्यांनी सर्वांना एनईपी 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवाहन केले, वर्गखोल्यांमधून सर्जनशीलतेकडे आणि शिक्षणामधून राष्ट्रनिर्माणाकडे वाटचाल व्हावी, असे ते म्हणाले. 

या प्रसंगी, धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत, भारतात आपले कॅम्पस  स्थापन करण्यासाठी आघाडीच्या परदेशी विद्यापीठांना खालील इरादापत्रे  प्रदान  करण्यात आली, ज्यामुळे एनईपी 2020 अंतर्गत भारतीय उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने एक मोठी पायरी उचलण्यात आली:

यामध्ये मुंबईत स्थापन करण्यात येणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल, युनायटेड किंगडमचा देखील समावेश आहे. 

1909 मध्ये स्थापन झालेली आणि क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये 51 व्या क्रमांकावर असलेली युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल हे ग्रेट ब्रिटन मधील एक प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे. 

प्रधान यांच्या हस्ते 4,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे अनावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, कॅम्पसचे उदघाटन आणि भूमिपूजन झाले. 

   

 

* * *

सोनाली काकडे/भक्‍ती/गजेंद्र/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149824)