रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 'सुट्या फास्टॅग' ची नोंदणी काळ्या यादीत करण्याची प्रक्रिया गतिमान केली
Posted On:
11 JUL 2025 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2025
टोल वसुलीचे व्यवहार सुरळीत व्हावेत आणि 'सुट्या फास्टॅग' ची नोंदणी काळ्या यादीत करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 'लूज फास्टॅग', किंवा 'टॅग-इन-हँड' बद्दल आपले धोरण अधिक सुलभ केले आहे. या अंतर्गत लूज फास्टॅग संदर्भात त्वरित तक्रार दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी टोल संकलन करणाऱ्या एजन्सी आणि संस्थांना प्राधिकरणाने सूचना केल्या आहेत. वार्षिक पास प्रणाली आणि मल्टी-लेन फ्री फ्लो (एमएलएफएफ) टोल सारख्या आगामी उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर, फास्टॅगची सत्यता आणि या प्रणालीची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी या समस्येचे निराकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वाहनधारक कधीकधी जाणूनबुजून वाहनाच्या काचेवर फास्टॅग लावत नाहीत. यामुळे टोलवसुलीत अनेक अडचणी निर्माण होतात ज्याची परिणती लेनमध्ये गर्दी होण्यात होते. याशिवाय खोटे शुल्क आकारले जाणे, बंद लूप टोलिंग प्रणालीचा गैरवापर करणे, वाढीस लागते. यामुळे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन आराखड्याच्या कार्यात व्यत्यय येतो, परिणामी टोल प्लाझावर अनावश्यक विलंब होतो आणि राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होते.
या गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी एनएचएआयने टोल संकलन एजंसी आणि संस्थांना एक समर्पित इमेल आय डी दिला असून या नोंदी त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालांनुसार एनएचएआय अशा फास्टॅगना काळ्या यादीत टाकण्यासाठी किंवा त्यांचे हॉटलिस्टिंग करण्यासाठी तात्काळ कारवाई करेल.
देशात 98 टक्क्यांहून अधिक फास्टॅग प्रक्रिया यशस्वी झाल्याने देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. मात्र 'लूज फास्टॅग', किंवा 'टॅग-इन-हँड' मुळे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. या उपक्रमामुळे टोल व्यवहार जास्त कार्यक्षम होऊन राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना अधिक सुरळीत आणि सुखद प्रवासाचा अनुभव घेता येईल.
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144021)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu