पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट

Posted On: 09 JUL 2025 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती लूला यांनी मर्यादित आणि प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा केली आणि भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. त्यांनी भारत-ब्राझीलमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आधार देणाऱ्या सामायिक मूल्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केले.  व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, आरोग्य आणि औषधनिर्माण, अवकाश, अक्षय ऊर्जा, शेती आणि अन्न प्रक्रिया, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा विकास, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआय, पारंपारिक औषध, योग, क्रीडा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी महत्वपूर्ण खनिजे, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, एआय आणि सुपरकॉम्प्युटर, डिजिटल सहयोग आणि गतिशीलता यासारख्या सहकार्याच्या  क्षेत्रांमध्ये   नवीन संधींचा शोध घेतला.

दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि व्यावसायिक बाबींवर चर्चा करण्यासाठी मंत्रीस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याचे स्वागत केले. त्यांनी भारत-मर्कोसुर प्राधान्य व्यापार कराराच्या विस्तारासह द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्यावर चर्चा केली. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट नेत्यांनी ठेवले. ऊर्जा क्षेत्रातील वर्तमान सहकार्याचा आढावा घेत, दोन्ही नेत्यांनी हायड्रोकार्बन तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये प्रचंड क्षमता असल्याने गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यावर सहमती दर्शविली.

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले. हे दोन्ही देशांच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करते. दहशतवादा बाबत  अजिबात सहनशीलता नसावी आणि अशा अमानवी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. दहशतवादाशी लढण्यासाठी आणि त्याचा पराभव करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आणि जागतिक समुदायासोबत काम केले पाहिजे यावर अध्यक्ष लूला यांनी सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी बहुपक्षीयता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जागतिक कृती बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्याचेही त्यांनी मान्य केले. पंतप्रधानांनी आगामी COP30 हवामान बदल परिषदेसाठी ब्राझीलला शुभेच्छा दिल्या. ग्लोबल साऊथचे हित  जपण्यासाठी   एकत्रितपणे काम करत राहण्याचे त्यांनी मान्य केले.

चर्चेनंतर,दहशतवादविरोधी, सुरक्षा क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण, कृषी संशोधन, अक्षय ऊर्जा, बौद्धिक संपदा हक्क आणि डिजिटल सहकार्य [इंडिया स्टॅक] या क्षेत्रातील सहा सामंजस्य करार [तपशील येथे पाहता येतील] अंतिम करण्यात आले. राज्य भेटीच्या निमित्ताने एक संयुक्त निवेदन [लिंक] स्वीकारण्यात आले.

राष्ट्रपती लूला यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारच्या जेवणाचे आयोजन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रपती लूला यांच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले आणि त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.


S.Tupe/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2143409)