पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' हा  सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे, तुमच्या सरकारचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो, हा सन्मान आपल्या दोन्ही देशांमधील शाश्वत आणि दृढ मैत्रीचे प्रतीक आहे, 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी हा सन्मान सामायिक अभिमानाने स्वीकारतो: पंतप्रधान मोदी

भारतीय समुदायाने आजही आपल्या सामायिक परंपरा, संस्कृती आणि चालीरीती जपल्या आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, राष्ट्रपती कांगालू जी आणि पंतप्रधान कमला जी या समुदायाचे सर्वात मोठे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत: पंतप्रधान

त्रिनिदाद आणि टोबॅगो हे केवळ भारताचे कॅरिकॉम भागीदार नाहीत, तर जागतिक स्तरावर महत्त्वाचे भागीदारही आहेत, आपले सहकार्य संपूर्ण ग्लोबल साउथ साठी महत्वाचे आहे: पंतप्रधान मोदी 

Posted On: 04 JUL 2025 9:17PM by PIB Mumbai

 

पोर्ट ऑफ स्पेन येथील राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात, त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या राष्ट्रपति क्रिस्टीन कार्ला कांगालू ओआरटीटी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे राजकीय कौशल्य, ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचे स्थान देणे, आणि भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार - "द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो" प्रदान केला. पंतप्रधान मोदी, हा पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी नेते आहेत.

भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना, पंतप्रधानांनी हा सन्मान दोन्ही देशांमधील मैत्रीच्या चिरस्थायी बंधांना समर्पित केला. 180 वर्षांपूर्वी या देशात आलेल्या भारतीयांनी रचलेला सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक वारसा, या विशेष संबंधांचा पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो यांच्यातील द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

या कार्यक्रमाला त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या पंतप्रधान कमला पर्साद-बिसेसर, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, संसद सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142379)