राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी ड्युरंड कप स्पर्धेच्या ट्रॉफींचे अनावरण केले

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2025 12:25PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आज (4 जुलै 2025) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात  राष्ट्रपतीद्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

या प्रसंगी आपल्या संक्षिप्त भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, खेळ शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढवतात. लोकांना, प्रदेशांना आणि देशांना जोडण्याची खेळांमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे. भारतात, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक शक्तिशाली साधन राहिले आहे. ऑलिंपिकमध्ये किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिरंगा फडकला की सर्व देशवासीय रोमांचित होतात.

राष्ट्रपती म्हणाल्या की, कोट्यवधी लोकांच्या मनात फुटबॉलचे एक विशेष स्थान आहे. हा केवळ एक खेळ नाही; ती एक आवड आहे. फुटबॉलचा खेळ म्हणजे रणनीती, सहनशक्ती आणि समान ध्येयासाठी एकत्र काम करणे. ड्युरंड कप सारख्या स्पर्धा केवळ खेळाची भावनाच वाढवत नाहीत तर फुटबॉल खेळाडूंच्या पुढील पिढीला विकसित करण्यास मदत करतात, त्यांना प्रगतीसाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. ड्युरंड कपची भावना जिवंत ठेवण्यात आणि प्रोत्साहन देण्यात सशस्त्र दलांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

***

S.Kane.S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2142251) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Khasi , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam