पंतप्रधान कार्यालय
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2025 9:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पोर्ट ऑफ स्पेन येथे आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहीप यांनी ‘ वैष्णव जन तो’ हे गीत गायले होते.
भारतीय संगीत आणि संस्कृती याविषयी मोहीप यांना असलेल्या आवडीची पंतप्रधानांनी अतिशय जिव्हाळ्याने प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
" पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आयोजित मेजवानी कार्यक्रमात राणा मोहीप यांच्याशी भेट झाली, ज्यांनी काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘ वैष्णव जन तो’ हे गीत गायले होते. भारतीय संगीत आणि संस्कृती याविषयी मोहीप यांना असलेले प्रेम अतिशय प्रशंसनीय आहे. "
***
JPS/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142100)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam