पंतप्रधान कार्यालय
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2025 8:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद जी यांचे सामाजिक विचार आणि दृष्टिकोन आपल्यासाठी दिशादर्शक आहेत,असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आपल्या इतिहास आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची आणि आत्मविश्वासाची भावना जागृत केली, असेही मोदी यांनी पुढे नमूद केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
"स्वामी विवेकानंदजींना यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी प्रणाम करत आहे.त्यांचे सामाजिक विचार आणि दृष्टिकोन आपल्यासाठी दिशादर्शक आहेत. त्यांनी आपल्यामध्ये इतिहास आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि आत्मविश्वासाची भावना जागृत केली.तसेच सेवा आणि करुणेच्या मार्गावर चालण्यावर देखील त्यांनी भर दिला."
***
JPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142078)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam