अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्राम पंचायत (जीपी) आणि शहरी स्थानिक संस्था (युएलबी) स्तरावर आर्थिक समावेशन योजनांच्या संपृक्ततेसाठी केंद्रीय आर्थिक सेवा विभागातर्फे 01.07.2025 ते 30.09.2025 दरम्यान 3 महिन्यांच्या अभियानाची सुरुवात


अभियानाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये बँकेत खाते नसलेल्या प्रौढांसाठी पीएमजेडीवाय अंतर्गत बँक खाती उघडणे; पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय, एपीवाय यांच्याअंतर्गत नोंदणीत वाढ करणे; डिजिटल घोटाळे रोखण्यासंदर्भातील जनजागृती सत्रे यांसह इतर अनेक उपक्रमांचा समावेश

Posted On: 01 JUL 2025 6:38PM by PIB Mumbai

देशातील प्रत्येक ग्राम पंचायत  आणि शहरी स्थानिक संस्था  स्तरावर आर्थिक समावेशन  योजनांच्या संपृक्ततेसाठी केंद्रीय आर्थिक सेवा विभागातर्फे आज एका देशव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली. देशभरातील 33 ठिकाणी या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, राज्य सरकारी अधिकारी, एसएलबीसी निमंत्रक, बँकांचे अधिकारी-कर्मचारी तसेच लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. गुजरातमध्ये, मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली.

दिल्ली मध्ये  आर्थिक समावेशन अभियान

सदर अभियान देशभरातील सर्व 2.70 लाख ग्राम पंचायती आणि शहरी स्थानिक संस्थामध्ये दिनांक 01.07.2025 ते 30.09.2025 अशा तीन महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे.या कालावधीत अभियानाच्या माध्यमातून खालील कार्ये हाती घेण्यात येतील:

  1. सर्व बचत खातेधारकांचे पुन्हा ओळख-प्रमाणीकरण (जेथे लागू असेल तेथे)
  2. कोणत्याही बँकेत खाते नसलेल्या प्रौढांसाठी पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत (पीएमजेडीवाय)बँक खाती उघडणे
  3. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) तसेच अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय) यामध्ये नागरिकांची नोंदणी वाढवणे
  4. डिजिटल घोटाळ्यांना प्रतिबंध तसेच दावा न केलेल्या ठेवी परत मिळवणे आणि तक्रार निवारण याविषयीच्या जागरुकता सत्रांचे आयोजन
  5. बँक खात्यांमध्ये नामनिर्देशन अद्ययावत करण्याची सुविधा (जेथे प्रलंबित असेल तेथे)


ओदिशामधील बरगड येथे आयोजित आर्थिक समावेशन अभियान

संपृक्तता अभियानाच्या पहिल्या दिवशी देशभरातील 2087 ग्रामपंचायतींमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आली. देशभरातील लाभार्थ्यांनी या शिबिरांना उदंड प्रतिसाद दिला.

***

SushamaK/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141457)