पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत केले
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2025 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय बनण्याच्या तयारीत असलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनाही मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे:
“भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे आम्ही स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते 1.4 अब्ज भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा आपल्या बरोबर घेऊन जात आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना या मोहिमेसाठी शुभेच्छा!
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2139567)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam