पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवल्याबद्दल दिव्या देशमुखचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2025 3:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीच्या सेकंड लेगमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या हौ यिफान’वर ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये ब्लिट्झ उपांत्य फेरीच्या सेकंड लेगमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या हौ यिफान’ला पराभूत केल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. तिच्या यशातून तिची जिद्द, मेहनत आणि दृढनिश्चय दिसून येतो. तिचे हे यश उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारे आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@DivyaDeshmukh05”
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137659)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam