पंतप्रधान कार्यालय
भारताच्या तांत्रिक कापड उद्योग क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या वाढीबाबतचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2025 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
भारताचे तांत्रिक कापड उद्योग क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून कसे जात आहे याविषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर शेअर केला आहे. नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल्स मिशन (एनटीटीएम) आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) सारख्या महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांमुळे हे शक्य झाले आहे, असे लेखात म्हटले आहे. हे प्रयत्न देशांतर्गत उत्पादन वाढवणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि निर्यातीत वाढ करणे यांमध्ये हातभार लावत असून भारताला तांत्रिक कापड उद्योग क्षेत्रात जगात आघाडीचे स्थान मिळवून देत आहेत.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या X वरील संदेशाला उत्तर देताना मोदी म्हणाले,
“भारताचे तांत्रिक कापड उद्योग क्षेत्र नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल्स मिशन आणि पीएलआय योजनेसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांमुळे झपाट्याने प्रगती करत आहे. हे प्रयत्न उत्पादन, नवोन्मेष आणि निर्यातीत मोठी वाढ घडवून आणत असून भारताला जगात आघाडीचे स्थान मिळवून देत आहेत, असे केंद्रीय मंत्री @girirajsinghbjp यांनी लिहिले आहे.”
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135365)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam