पंतप्रधान कार्यालय
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाबद्दल भारताच्या शून्य-सहिष्णुतेवरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2025 12:38PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. या लेखामध्ये भारत सीमापार दहशतवादाला अजिबात सहन करत नाही असे म्हटले आहे.
भारतावरील कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि दहशतवादी आणि त्यांना सहकार्य करणारे यांच्यात कोणताही भेद केला जाणार नाही, असे या लेखात संरक्षण मंत्र्यांनी ठामपणे मांडल्याचे मोदी म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांच्या लेखाबद्दल X पोस्टवर मोदी यांनी लिहिले आहे ;
"संरक्षणमंत्री @rajnathsingh यांनी सीमापार दहशतवादाबाबत भारताच्या शून्य-सहिष्णुतेचा पुनरुच्चार केला. भारतावरील कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल आणि दहशतवादी आणि त्यांना सहकार्य करणारे यांच्यात कोणताही भेद केला जाणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे"
***
NM/H.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2134794)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam