पंतप्रधान कार्यालय
हरित भविष्यासाठी भारतीय रेल्वे बजावत असलेल्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल माहिती देणारा लेख पंतप्रधानांनी सामाईक केला
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2025 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
हरित भविष्यासाठी भारतीय रेल्वे कशाप्रकारे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे याविषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केला आहे. जलदगतीने होणारे विद्युतीकरण आणि स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य दिल्यामुळे भारतीय रेल्वे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या मार्गावर आहे,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी लिहिलेल्या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
"जागतिक पर्यावरण दिनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हरित भविष्याच्या उभारणीसाठी भारतीय रेल्वे कशाप्रकारे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे याविषयी लेख लिहिला आहे. जलदगतीने होणारे विद्युतीकरण आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळल्यामुळे भारतीय रेल्वे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या मार्गावर आहे.
S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2134120)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam