पंतप्रधान कार्यालय
उलानबटोर खुली स्पर्धा 2025 मधील कुस्तीपटूंच्या शानदार कामगिरीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
02 JUN 2025 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलानबटोर खुली स्पर्धा 2025 मधील तिसऱ्या रँकिंग सिरीजमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, "आपल्या नारी शक्तीने रँकिंग सिरीजमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत या विजयाला अधिक संस्मरणीय बनवले आहे. क्रीडापटूंची ही कामगिरी भविष्यातील अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल."
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी सतत नवे उच्चांक गाठत आहे! उलानबटोर खुली स्पर्धा 2025 मधील तिसऱ्या रँकिंग सिरीजमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या आपल्या कुस्तीपटूंचे अभिनंदन. भारताने 21 पदके पटकावली आहेत, ज्यामध्ये 6 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. आपल्या नारी शक्तीने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ज्यामुळे ही उपलब्धी अधिक संस्मरणीय झाली आहे. ही कामगिरी अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल."
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133405)
Read this release in:
Urdu
,
Malayalam
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada