पंतप्रधान कार्यालय
गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2025 4:43PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. "गोव्याची अद्वितीय संस्कृती ही भारताचा अभिमान आहे. गोव्याच्या लोकांनी विविध क्षेत्रात आपला एक अमिट ठसा उमटवला आहे. हे राज्य नेहमीच जगभरातील लोकांना आकर्षित करत आले आहे", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्याच्या माझ्या बंधू आणि भगिनींना शुभेच्छा. गोव्याची अद्वितीय संस्कृती ही भारताचा अभिमान आहे. गोव्याच्या लोकांनी विविध क्षेत्रात आपला एक अमिट ठसा उमटवला आहे. हे राज्य नेहमीच जगभरातील लोकांना आकर्षित करत आले आहे. गेल्या दशकभरात गोव्याच्या प्रगतीला चालना देणारे बरेच काम झाले आहे. आगामी काळात राज्य विकासाची नवीन शिखरे गाठत राहो."
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2132802)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam