राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नागरी सन्मान सोहळा II मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2025 साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण

Posted On: 27 MAY 2025 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2025


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (27 मे 2025) राष्ट्रपती भवनात झालेल्या नागरी सन्मान सोहळ्यामध्ये 2025 या वर्षातील पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री पुरस्कार प्रदान केले. या समारंभाला उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रिय गृहमंत्री उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये सार्वजनिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. मनोहर जोशी (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.विलास गजाननराव डांगरे (वैद्यकीय सेवा), अश्विनी भिडे देशपांडे (कला), अच्युत रामचंद्र पालव (कला), अशोक लक्ष्मण सराफ (कला) आणि  सुभाष खेतुलाल शर्मा (इतर-कृषी) यांना  पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त व्यक्तींची  यादी आणि समारंभाची छायाचित्रे  सोबत  जोडली  आहेत.


S.Kane/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2131837)