पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचे भूषवले अध्यक्षपद
Posted On:
25 MAY 2025 6:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या विकासाच्या मार्गांना गती देण्याची आणि डबल-इंजिन सरकारचे फायदे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज यावर पंतप्रधानांनी भर दिला.
एक्स वरील एका थ्रेड पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले:
“दिल्लीत एनडीए मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाग घेतला. विविध मुद्द्यांवर आम्ही व्यापक चर्चा केली. विविध राज्यांनी जलसंवर्धन, तक्रार निवारण, प्रशासकीय चौकट मजबूत करणे, शिक्षण, महिला सक्षमीकरण, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रांमधील आपल्या सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शन केले. हे अनुभव ऐकून खूप आनंद झाला.”
"आपल्या विकासाच्या मार्गांना गती देण्याची आणि डबल-इंजिन सरकारचे फायदे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज मी अधोरेखित केली. स्वच्छता, सफाई, आरोग्यसेवा, युवा सक्षमीकरण, शेती, तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मजबूत सहकार्य निर्माण करण्याबद्दल विचार मांडले.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131213)