पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 23 मे रोजी नवी दिल्लीत रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिटचे करणार उद्घाटन
लक्षवेधी क्षेत्रेः पर्यटन, कृषी-अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऊर्जा, मनोरंजन आणि क्रीडा
ईशान्य प्रदेशाला संधींची भूमी म्हणून अधोरेखित करणे आणि जागतिक व स्थानिक गुंतवणूक आकर्षित करणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट
Posted On:
22 MAY 2025 4:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2025
ईशान्येकडील प्रदेशाला संधींची भूमी म्हणून अधोरेखित करण्याच्या, जागतिक आणि स्थानिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या, तसेच प्रमुख भागधारक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकाच मंचावर आणण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 मे रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे 'रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट' चे उद्घाटन करतील.
'रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट' 23-24 मे रोजी होणारा दोन दिवसांचा कार्यक्रम असून केंद्र सरकारने, ईशान्येकडील राज्य सरकारांच्या सक्रीय पाठिंब्याने आयोजित केलेले विविध रोडशो, राज्यांच्या गोलमेज परिषदा, ज्यात राजदूत बैठक (Ambassador’s Meet) आणि द्विपक्षीय चेंबर्स बैठक यांचा समावेश आहे, अशा शिखर परिषद - पूर्व उपक्रमांचा हा सांगता समारंभ आहे. या परिषदेमध्ये मंत्रीस्तरीय सत्रे, बिझनेस-टू-गव्हर्न्मेंट सत्रे, बिझनेस-टू-बिझनेस बैठका, स्टार्टअप्स आणि गुंतवणूक प्रोत्साहनार्थ राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालयांनी हाती घेतलेल्या धोरणांचे आणि संबंधित उपक्रमांचे प्रदर्शन यांचा समावेश असेल.
गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रामुख्याने भर देण्यात येणाऱ्या क्षेत्रांमध्ये पर्यटन आणि आदरातिथ्य; कृषी-अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रे; वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला; आरोग्यसेवा; शिक्षण आणि कौशल्य विकास; माहिती तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा; पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स; ऊर्जा; आणि मनोरंजन व क्रीडा यांचा समावेश आहे.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130543)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam