पंतप्रधान कार्यालय
डॉ.जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2025 2:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
खगोलभौतिकशास्त्र क्षेत्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी X वरील संदेशात लिहिले आहे :
“डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन हे वैज्ञानिक समुदायाचे प्रचंड नुकसान आहे.ते विशेषतः खगोलभौतिकशास्त्र क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या संशोधनातील अग्रगण्य कार्य, विशेषतः काही महत्त्वपूर्ण सैद्धांतिक चौकटी, संशोधकांच्या भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठरतील. एक संस्थापक म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली. अनेक शैक्षणिक आणि नवोपक्रम केंद्रांची उभारणी करून त्यांनी युवा मनांना घडविले. सामान्य नागरिकांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांच्या लेखनानेही मोलाचे योगदान दिले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे सांत्वन.ओम शांती."
S.Kakade/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2129840)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam