पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा

Posted On: 11 MAY 2025 2:32PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. मोदी यांनी आपल्या शास्त्रज्ञांप्रती अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली तसेच 1998 मधील पोखरण चाचणीची आठवण करून दिली आहे. त्यांनी विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना सक्षम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार देखील केला आहे.

‘एक्स’ या सामाजिक संपर्क माध्यमा वरील आपल्या संदेशामध्ये पंतप्रधानांनी लिहिले:

"राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस आपल्या शास्त्रज्ञांविषयी अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि 1998 मधील पोखरण चाचणी आठवण्याचा आहे. त्या घटना आपल्या देशाच्या विकासप्रवासात प्रामुख्याने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड ठरल्या आहेत.

आपल्या नागरिकांच्या सामर्थ्यावर आधारित भारत आज तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये—अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल नवकल्पना, हरित तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये—जगात अग्रगण्य बनत आहे. विज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना सक्षम करण्याचा आपला संकल्प आपण पुन्हा दृढ करत आहोत. तंत्रज्ञान मानवतेचा विकास करो, आपल्या देशाची सुरक्षा करो आणि भविष्यातील प्रगतीस चालना देवो."

***

M.Jaybhaye/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2128135) Visitor Counter : 2