पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे केले अभिनंदन
दोन्ही नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारी (सीएसपी) बळकट करण्याप्रती असलेल्या त्याच्या कटिबद्धतेला दुजोरा दिला
एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य करून दोन्ही नेत्यांनी त्यांच्या आगामी भेटीबद्दल उत्सुकता व्यक्त केली
Posted On:
06 MAY 2025 2:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 06 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अँथनी अल्बानीज यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी संवाद साधला आणि ऑस्ट्रेलियाचे 32 वे पंतप्रधान म्हणून अल्बानीज यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांतील व्यापक धोरणात्मक भागीदारी (सीएसपी) बळकट करण्याप्रती असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेला दुजोरा दिला. गेल्या 5 वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये सशक्त भागीदारी विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. द्विपक्षीय नात्याला मजबूत करण्यात भारतीय वंशाच्या उत्साही समुदायाने निभावलेल्या भूमिकेवर त्यांनी अधिक भर दिला.
या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी परस्पर स्वारस्याच्या क्षेत्रीय तसेच जागतिक मुद्द्यांबाबत आपापल्या विचारांचे आदानप्रदान देखील केले. तसेच त्यांनी मुक्त, खुल्या, नियमांवर आधारित आणि समृद्ध हिंद-प्रशांत परिसरासाठी एकत्र येऊन काम करण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान अल्बानीज यांना या वर्षी भारतात आयोजित वार्षिक शिखर परिषद आणि क्वाड शिखर परिषद या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
***
S.Kakade/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127241)
Visitor Counter : 28
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam