WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबईत आयोजित ‘वेव्ह्स 2025’ मध्ये उद्या अर्न्स्ट अँड यंगच्या 'अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ अहवालाचे प्रकाशन होणार

 Posted On: 02 MAY 2025 4:55PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 2 मे 2025

 

‘कंटेंट पॉवर हाउस’ (आशय निर्मितीचे केंद्र) म्हणून भारताचा उदय, हा अर्न्स्ट अँड यंगच्या 'अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ या अहवालाचा केंद्रबिंदु असून मुंबईत आयोजित ‘वेव्ह्स 2025’ मध्ये उद्या या अहवालाचे प्रकाशन होणार आहे. या अहवालात जागतिक प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन (एम अँड ई) परीप्रेक्ष्यातील भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित करण्यात आला आहे, जो त्याची वाढती डिजिटल बाजारपेठ, सांस्कृतिक विविधता आणि प्रगत उत्पादन क्षमतेमुळे प्रेरित आहे:

  • भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि प्रगत पायाभूत सुविधांनी त्याला सृजनशीलतेचे पॉवरहाऊस बनवले आहे.  
  • भारतात अॅनिमेशन आणि व्हीएफएक्सचा खर्च 40% ते 60% कमी आहे आणि जागतिक उत्पादन कार्यप्रवाहाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे.
  • भारतीय कंटेंटला (आशयघन सामुग्री) आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, जागतिक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 25% व्ह्यूज (प्रेक्षक संख्या) भारताबाहेरचे आहेत.

एम अँड ई क्षेत्रातील लक्षवेधी विकास आणि नवोन्मेश, यामुळे जागतिक कंटेंट निर्मितीत भारताला अव्वल स्थान मिळाल्याचे अधोरेखित करणे, हे या अहवालाचे उद्दिष्ट आहे. वाढती डिजिटल बाजारपेठ, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि भाषिक वारसा आणि जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारी समृद्ध कथाकथन परंपरा यामुळे भारत वेगाने जागतिक कंटेंट हब (आशय निर्मितीचे केंद्र) बनत आहे.

अहवालातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे असतील:

  • डिजिटल मीडियाचा प्रभाव: 2024 मध्ये, डिजिटल मीडियाने टेलिव्हिजनला मागे टाकत भारताच्या एम अँड ई क्षेत्राचा सर्वात मोठा व्यापार, आणि या क्षेत्रासाठी 800 अब्ज रुपयांहून (यूएस $ 9.4 अब्ज) अधिक योगदान देत महसुलात 32% भर घातली.
  • कंटेंट (आशय) निर्मिती: भारतात गेल्या वर्षी सुमारे 200,000 तासांच्या अस्सल (मूळ) सामग्रीची निर्मिती झाली. यामध्ये 1,600 चित्रपट, 2,600 तासांचा प्रीमियम ओटीटी कंटेंट आणि 20,000 ओरिजिनल (मूळ) गाण्यांचा समावेश आहे. यामुळे भारत जगातील सर्वात मोठ्या कंटेंट क्रिएशन हाऊस (आशय निर्मिती केंद्र) मधील एक बनला आहे.  
  • तांत्रिक प्रगती: एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि नवीन तंत्रज्ञान भारतातील कंटेंट उद्योगात क्रांती घडवत आहे. एआय-आधारित प्लॅटफॉर्म कंटेंट उत्पादनाची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारतात, ज्यामुळे व्यावसायिक-श्रेणीतील व्हिडिओ, प्रतिमा, मजकूर आणि संगीताची जलद निर्मिती सुलभ होते.
  • लाइव्ह इव्हेंट्स ची वाढती संख्या: 2024 या एका वर्षात भारताने 30,000 हून अधिक लाइव्ह इव्हेंट्सचे आयोजन केले. यामध्ये एड शीरन आणि कोल्डप्ले सारख्या जागतिक कलाकारांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत तिकिट काढून कार्यक्रम बघण्याचे प्रमाण चौपट वाढले असून, यामधून लाइव्ह मनोरंजनाची वाढती अभिरुची अधोरेखित होते.
  • प्रतिभावंतांचे वाढते प्रमाण: एम अँड ई क्षेत्राने 2.8 दशलक्ष लोकांना थेट रोजगार, तर अतिरिक्त 10 दशलक्ष लोकांना अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. भारतातील प्रतिभावंतांना इथल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि भाषिक परीप्रेक्ष्याने समृद्ध केले असून त्यामुळे कंटेंट (आशय निर्मिती) परिसंस्थेला चालना मिळाली आहे.

 

* * *

PIB Mumbai | H.Raut/R.Agashe/D.Rane


Release ID: (Release ID: 2126192)   |   Visitor Counter: 15