WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 मध्ये उद्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र 2024-25 साठी सांख्यिकीविषयक हस्तपुस्तिका प्रकाशित करणार

 Posted On: 02 MAY 2025 3:50PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 2 मे 2025

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र 2024-25 साठी उद्या वेव्हज 2025परिषदे मध्ये सांख्यिकीविषयक  हस्तपुस्तिका प्रकाशित होणार आहे. माध्यम आणि मनोरंजन हे सेवा क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक असल्याने आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावण्याची प्रचंड क्षमता असल्याने, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावरील वेळच्यावेळी, विश्वासार्ह, प्रामाणिक आणि व्यापक डेटाची आवश्यकता सरकारच्या प्रतिपादनाचा हा एक भाग आहे. नवीनतम अंदाजानुसार, माध्यम आणि मनोरंजन परिसंस्था हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे जे 2027 मध्ये 7% सीएजीआरने वाढून 3067 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. इष्टतम फलनिष्पत्तीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध धोरणात्मक उपक्रमांना आणि त्याच्या अंमलबजावणीला योग्य डेटाचा आधार घ्यावा लागतो. 

मंत्रालय आणि या क्षेत्रातील इतर हितधारकांच्या डेटाची आवश्यकता लक्षात घेऊन, माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्राच्या विविध विभागांवरील अद्यतनित डेटा आणि माहितीसह माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र 2024-25 वरील सांख्यिकी पुस्तिकेचे उद्या वेव्हज 2025 मध्ये प्रकाशन केले जाईल.

2024-25 च्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावरील सांख्यिकी पुस्तिकेतील काही अंश खालीलप्रमाणे आहेत:

  • नोंदणीकृत मुद्रित प्रकाशने 1957 मधील 5,932 वरून 2024-25 मध्ये 4.99% सीएजीआर सह 154,523 पर्यंत वाढली.
  • 2024-25 दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने बालसाहित्य, इतिहास आणि स्वातंत्र्यलढे, व्यक्तिमत्त्वे आणि चरित्रे, आधुनिक भारताचे निर्माते, विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण आणि इतर विषयांसह विविध विषयांवर एकूण 130 पुस्तके प्रकाशित केली आहेत.
  • मार्च 2025 पर्यंत डीटीएच सेवेद्वारे 100% भौगोलिक व्याप्ती.
  • दूरदर्शन मोफत डिश चॅनेल: 2004 मध्ये 33 चॅनेल होती जी 2025 मध्ये 381 झाली.
  • ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) व्याप्ती: मार्च 2025 पर्यंत 98% लोकसंख्येला नभोवाणीचे कार्यक्रम ऐकता येतात. 2000 मध्ये 198 असलेली नभोवाणी केंद्रांची संख्या 2025 मध्ये 591 झाली.
  • खाजगी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांची संख्या 2004-05 मधील 130 वरून 2024-25 मध्ये 908 पर्यंत वाढली.
  • खाजगी एफएम केंद्र 2001 मध्ये 4 होती जी 2024 पर्यंत 388 वर पोहोचली. 
  • 31.03.2025 रोजी भारतातील राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार कार्यरत खाजगी एफएम रेडिओ केंद्रांची माहिती.
  • कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स (सी आर एस) ची संख्या 2005 मधील 15 वरून 2025 मध्ये 531 पर्यंत वाढली. यात 31.03.2005 पर्यंतची देशभरातील राज्य/केंद्रशासित प्रदेश/जिल्हा/स्थानानुसार कार्यरत सी आर एस बद्दलची आकडेवारी देखील समाविष्ट आहे.
  • 1983 मध्ये 741 भारतीय  चित्रपटांना प्रमाणित केले गेले, याचे प्रमाण 2024-25 मध्ये 3455 पर्यंत वाढले, 2024-25 पर्यंत याची संचयी बेरीज संख्या 69,113 झाली.

सांख्यिकीय माहिती व्यतिरिक्त खालील माहिती देखील पुस्तिकेमध्ये उपलब्ध आहे:

  • एनएफडीसीने आयोजित केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि निर्मित माहितीपटांसह चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार देखील पुस्तिकेमध्ये उपलब्ध आहेत.
  • डिजिटल मीडिया आणि क्रिएटर इकॉनॉमी ज्यामध्ये वेव्हज 2025 अंतर्गत वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) यांचा समावेश आहे.
  • माहिती आणि प्रसारण क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना जसे की प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (पीआरजीआय), आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी एफएम रेडिओ स्टेशन्स आणि टीव्ही-इनसॅट
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत विविध कौशल्य अभ्यासक्रम.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून परिवर्तनात्मक पोर्टलचा समावेश असलेले व्यवसाय सुलभता उपक्रम.

 

* * *

PIB Mumbai | JPS/Vasanti/Nandini/D.Rane


Release ID: (Release ID: 2126139)   |   Visitor Counter: 20