माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदीय राजभाषा समितीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली भेट

Posted On: 23 APR 2025 12:19PM by PIB Mumbai

मुंबई, 23 एप्रिल 2025

 

संसदीय राजभाषा समितीच्या सदस्यांनी मंगळवार, 22 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) ला भेट दिली.

या शिष्टमंडळात खासदार शंकर लालवानी (इंदूर लोकसभा मतदारसंघ), हरिभाई पटेल (मेहसाणा लोकसभा मतदारसंघ), कुलदीप इंदोरा (गंगानगर लोकसभा मतदारसंघ), डॉ. सुमेर सिंग सोलंकी (राज्यसभा), झिया उर रहमान (संभल लोकसभा मतदारसंघ), सचिव (समिती) प्रेम नारायण  यांचा समावेश होता.

एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संसदीय समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार रवींद्र कुमार जैन हे देखील यावेळी उपस्थित होते.

एनएमआयसीच्या विपणन आणि जनसंपर्क  व्यवस्थापक जयता घोष आणि उपमहाव्यवस्थापक आणि क्युरेटर सत्यजित मंडले यांनी या सदस्यांसाठी संग्रहालयाचा दौरा आयोजित केला होता. राजभाषा  समितीच्या सदस्यांना भारतीय चित्रपटाचा ऐतिहासिक प्रवास, तंत्रज्ञान विषयक प्रगती, दुर्मिळ पोस्टर्स आणि वैशिष्ट्यपूर्ण संग्रह याबाबत अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली.

येथील प्रदर्शन पाहून सदस्य अतिशय प्रभावित झाले आणि भारतीय चित्रपटाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि तो प्रदर्शित केल्याबद्दल संग्रहालयाचे कौतुक केले. ही भेट केवळ ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण नव्हती तर भावनिक देखील होती, जिने भारतीय चित्रपटाच्या आत्म्याशी एक अनोखा बंध असल्याची जाणीव करून दिली.  भविष्यात संग्रहालयाला पुन्हा भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

एनएमआयसी आणि एनएफडीसी दोघांसाठीही हा प्रसंग अभिमानाचा क्षण होता, कारण देशाच्या प्रमुख धोरणकर्त्यांनी भारतीय चित्रपटाच्या चिरंतन वारशाची दखल घेतली आणि प्रशंसा केली.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123719) Visitor Counter : 31