पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुस्लिम वर्ल्ड लीगच्या सरचिटणीसांनी घेतली भेट
Posted On:
23 APR 2025 11:08AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2025
मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी आज जेद्दाह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी कठोर शब्दात निषेध केला असून निष्पाप जीव गमावल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
जुलै 2023 मध्ये नवी दिल्ली येथे त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. सहिष्णु मूल्यांना चालना देण्यासाठी तसेच संयमाचा पुरस्कार करून आणि सामाजिक एकोपा आणि सौहार्द वाढवण्यासाठी मुस्लिम वर्ल्ड लीगने घेतलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. वसुधैव कुटुंबकम [जग एक कुटुंब आहे] या भारताच्या प्राचीन तत्त्वज्ञानाचे स्मरण करत पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत एक बहु-सांस्कृतिक, बहु-भाषिक, बहु-वांशिक आणि बहु-धार्मिक समाज असून या विविधतेमध्ये असलेल्या एकतेचा पुरस्कार करतो. भारतामध्ये असलेले ही अतुलनीय वैविध्य हे या देशाचे एक मौलिक सामर्थ्य आहे; यामुळेच त्याच्या बहुविध समाजाला आणि राजकारणाला आकार दिला आहे. अतिरेकी, दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विरोधात मुस्लिम वर्ल्ड लीगने ठाम भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
अनेक क्षेत्रांमध्ये शाश्वत सहकार्याने विकसित झालेल्या सौदी अरेबियासोबतच्या संबंधांना भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.घनिष्ठ सामाजिक-सांस्कृतिक संबंध हा या सहकार्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
* * *
S.Bedekar/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123687)
Visitor Counter : 23
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada