माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 ॲनिमेशन फिल्म मेकर्स चॅलेंजने सर्वोत्कृष्ट 42 अंतिम स्पर्धकांची केली घोषणा
वेव्हज मूळ ॲनिमेशन, व्हीएफएक्स, एआर/व्हीआर आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शन्सचे जागतिक प्रदर्शन करत आहे
ॲनिमेशनपट निर्मिती स्पर्धेतील प्रतिभावान अंतिम फेरीतील स्पर्धक वेव्हज 2025 मध्ये आपले प्रकल्प सादर करतील
Posted On:
19 APR 2025 12:03PM
|
Location:
PIB Mumbai
वेव्हज 2025 शिखर परिषदेच्या 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन-1' चा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ॲनिमेशन फिल्म मेकर्स (एएफसी) च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांची घोषणा करण्यात आली आहे. पारंपरिक ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर)/व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शनचा समावेश असलेल्या ॲनिमेशनच्या संपूर्ण विस्तृत श्रेणीमध्ये मूळ कथाकथनावर लक्ष केंद्रित करणारे सर्वोत्तम 42 प्रकल्प अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या प्रतिभावान सहभागींना आता 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज शिखर परिषदेत त्यांचे मूळ प्रकल्प सादर करण्याची संधी मिळेल. सर्वोत्कृष्ट 3 विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
सर्वोत्तम 42 अंतिम स्पर्धकांची निवड ही वेव्हज टीमच्या सहकार्याने डान्सिंग ॲटम्स चमूच्या नेतृत्वाखालील नऊ महिन्यांच्या कठोर मूल्यांकन प्रक्रियेचे फलित आहे. सहभागींच्या समर्पित प्रयत्नांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्यांच्या एका सन्माननीय पॅनेलच्या तज्ञांनी गौरवान्वित केले आहे. त्यात यांचा समावेश होता:
- अनु सिंह
- फारुख धोंडी
- डॅन सार्तो
- जेम्स नाईट
- जान नागेल
- जियानमार्को सेरा
- इंदू रामचंदानी
- वैभव पिवळटकर
अंतिम 42 स्पर्धक आणि त्यांचे प्रकल्प यासाठी परिशिष्ट पहा

त्यांच्या प्रकल्पांचा संभाव्य आर्थिक परिणाम महत्त्वपूर्ण असून प्रत्येक ॲनिमेटेड व्हीएफएक्स फीचर फिल्म 100-300 व्यक्तींसाठी रोजगार निर्माण करण्यास सक्षम आहे. वेव्हज एएफसी 2025 ही भारतातील सर्जनशील प्रतिभेमध्ये एक महत्त्वाची गुंतवणूक असून ती रोजगार निर्मिती आणि जागतिक संधींना चालना देते. स्पर्धेचा उद्देश आंतरराष्ट्रीय सह-निर्मितींना चालना देण्याचा आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगाने आणि डान्सिंग ॲटम्सच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या अभूतपूर्व अशा स्पर्धेत एकाच छत्राखाली एव्हीजीसी विभागातील चारही क्षेत्रांनी प्रतिनिधित्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वेव्हज एएफसी 2025 ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जगभरातील सुमारे 1900 नोंदणी आणि 419 विविध प्रवेशिका सादर करण्यात आल्या आहेत. यात हौशी उत्साही, प्रतिभावान विद्यार्थी आणि अनुभवी व्यावसायिकांचा समावेश आहे. हा उत्साही सहभाग ॲनिमेशन उद्योगातील नवीन सर्जनशील संधी अधोरेखित करण्यात आणि त्या वृद्धिंगत करण्यात या स्पर्धेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो.
कलाकारांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यापलीकडे जाऊन, या उपक्रमाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शनाला प्राधान्य दिले आहे. सर्व स्पर्धकांना अकादमी पुरस्कार विजेत्या गुनीत मोंगा, प्रसिद्ध निर्माते शोबू यारलागड्डा आणि सरस्वती बुय्याला यांसारख्या दिग्गजांच्या मास्टरक्लासमधून अमूल्य मार्गदर्शन मिळाले. या सत्रांमध्ये प्रामुख्याने पिचिंग कौशल्य वाढवणे आणि उद्योगातील गुंतागुंतीच्या गोष्टी हाताळण्यावर भर देण्यात आला. या प्रकल्पांचे सादरीकरण विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि महत्त्वाच्या उद्योग प्रतिनिधींसमोर करण्यात येणार आहे.डान्सिंग एटॉम्स स्टुडिओजच्या संस्थापिका सरस्वती बुय्याला या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, ब्राझील, कॅनडा, चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, इटली, कोरिया, न्यूझीलंड, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, स्पेन आणि ब्रिटन या 17 देशांच्या दुतावासांशी सक्रियपणे संवाद साधून या टॉप-42 प्रकल्पांसाठी सहयोगासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख वितरकांशीही बैठका आयोजित केल्या जात आहेत.टॉप 42 प्रकल्पांमध्ये 12 फिचर फिल्म्स, 9 टीव्ही सिरीज, 3 एआर/व्हीआर अनुभव आणि 18 लघुपट यांचा समावेश असून, हे संभाव्य प्रेक्षक आणि सहकार्यांसाठी विविधतेने परिपूर्ण पर्याय देतात.
माहिती व प्रसारण मंत्रालयाचे महत्त्वपूर्ण सहकार्य हे एएफसी वेव्हस 2025 ला आजच्या उंचीवर पोहोचवण्यात मोलाचे ठरले आहे. अॅनिमेशन, व्हीएफएक्स, एआर/व्हीआर आणि आभासी निर्मिती क्षेत्रात मूळ कथा सांगण्याला चालना देण्यासाठी सरकारने प्रदान केलेल्या संसाधनांनी आणि मान्यतेने नवोदित प्रतिभेला सक्षम व्यासपीठ दिले आहे.
ही स्पर्धा आणि तिची काटेकोर निवड प्रक्रिया तसेच समृद्ध शिक्षण संधी यामधून भारताच्या सर्जनशील क्षमतेला चालना देण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. प्रत्येक निवडलेल्या प्रकल्पामध्ये एक अनोखी कथा आहे, जी विविध कलात्मक दृष्टिकोनातून मांडली गेली आहे, यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावी सादरीकरणांचाही समावेश आहे.
पुढील काळात अॅनिमेशन, व्हीएफएक्स, एआर/व्हीआर आणि आभासी निर्मिती क्षेत्रातील कथा सांगण्याचे भविष्यातील पर्व वेव्ह एएफसी 2025 मध्ये उलगडणार आहे.
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
***
PIB TEAM WAVES 2025 | N.Chitale/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Release ID:
(Release ID: 2122939)
| Visitor Counter:
54
Read this release in:
Telugu
,
Khasi
,
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam