माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताने चिलीला वेव्हज 2025 साठी केले आमंत्रित : राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी चिलीच्या मंत्री कॅरोलिना अरेडोंडो यांची घेतली भेट
Posted On:
02 APR 2025 4:27PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती - प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांच्या पाच दिवसांच्या भारत दौऱ्याचा भाग म्हणून चिलीच्या संस्कृती, कला आणि वारसा मंत्री कॅरोलिना अरेडोंडो, यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी चिलीला दिले वेव्हज 2025 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण
माननीय मंत्र्यांनी विविध चर्चांना चालना दिली, विशेषतः 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणाऱ्या आगामी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेबाबत (वेव्हज). माननीय मंत्र्यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आणि भारतीय शिल्पांचे चित्रण करणारे एक चित्र कॅरोलिना अरेडोंडो यांना भेट दिले.
या बैठकीला चिलीच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य देखील उपस्थित होते, ज्यात चिलीच्या दूतावासातील तृतीय सचिव मार्टिन गोरमाझ, परराष्ट्र मंत्रालयाचे अवर सचिव लक्ष्मी चंद्रा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट) डॉ. अजय नागभूषण एम.एन. यांचा समावेश होता.
भारत-चिली सहकार्याचा विस्तार
चिली प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट 1 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 76 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भारताच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष बोरिक नवी दिल्ली व्यतिरिक्त आग्रा, मुंबई आणि बंगळुरूला भेट देणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिली प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांनी त्यांच्या चर्चेदरम्यान दोन्ही राष्ट्रांमधील आर्थिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शविली. त्यांनी खनिजे, ऊर्जा, संरक्षण, अवकाश आणि कृषी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सहकार्यासाठी प्रचंड क्षमता असलेले क्षेत्र म्हणून ओळखले आणि त्यावर चर्चा केली.
चिलीमध्ये योग आणि आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता हा दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरावा असून आरोग्यसेवा निकटच्या संबंधांसाठी एक आशादायक मार्ग म्हणून उदयाला येत आहे. विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम आणि इतर उपक्रमांद्वारे सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याचे महत्त्वही नेत्यांनी अधोरेखित केले.
***
S.Patil/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118044)
Visitor Counter : 27
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam