माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 मध्ये भारतातील सर्वात मोठी कॉस्प्ले चॅम्पियनशिप केली जाणार आयोजित, या चॅम्पियनशिपमुळे पॉप संस्कृती आणि सर्जनशीलतेला मिळेल प्रोत्साहन

Posted On: 30 MAR 2025 11:13AM by PIB Mumbai

 

क्रिएटर्स स्ट्रीट आणि एपिको कॉन या संस्था तेलंगणा सरकार, आयसीए इंडियन कॉमिक्स असोसिएशन, फरबिडन मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया (एमईएआय), तेलंगणा व्हीएफएक्स ॲनिमेशन अँड गेमिंग असोसिएशन (टीव्हीएजीए) तसेच भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपची घोषणा करत आहेत. ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित कॉस्प्ले स्पर्धा आहे. 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात भारतातील सर्वात प्रतिभावान कॉस्प्लेअर्स एकत्र येऊन पॉप संस्कृतीच्या जगतातील आपली कलात्मकता, समर्पण आणि कारागिरीचा उत्सव साजरा करतील.

वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप बद्दल अधिक माहिती:

वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिपचा उद्देश भारतातील वाढत्या कॉस्प्ले समुदायाला आपले कौशल्य, सर्जनशीलता आणि पॉप संस्कृतीबद्दलची आवड दाखवण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना सक्षम बनवणे हे आहे. ही चॅम्पियनशिप भारतातील वाढत्या मनोरंजन आणि AVGC-XR क्षेत्राशी सुसंगत असून ती वेशभूषा, अभिनय आणि व्यक्तीरेखा उभारणीत स्व-अभिव्यक्ती आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देते.

स्पर्धेचे मुख्य आकर्षण

  • ग्रँड फिनाले: 80-100 अंतिम फेरीतील स्पर्धक वेव्हज 2025 च्या मंचावर त्यांचे कॉस्प्ले प्रत्यक्ष सादर करतील.
  • ज्युरी: सहभागींचे मूल्यांकन प्रतिष्ठित उद्योग तज्ञ, आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि कॉस्प्ले व्यावसायिक करतील.
  • विविध श्रेणी: स्पर्धेतील श्रेणीत भारतीय पौराणिक कथा, पॉप संस्कृती, अ‍ॅनिमे, मंगा, डीसी, मार्वल आणि इतर प्रकार सादर केले जातील.
  • जागतिक प्रदर्शन: आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याची संधी.
  • बक्षीसाची रक्कम: 1,50,000 रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जाणार.

स्पर्धेची रचना आणि निवडीचे निकष

  1. ऑनलाइन नोंदणी आणि ज्युरी कडून पुनरावलोकन - कॉस्प्लेअर्सना त्यांची नावे ऑनलाइन नोंदवावी लागतील, त्यानंतर ज्युरीद्वारे त्यांचे पुनरावलोकन केले जाईल.
  2. अंतिम फेरीतील निवड - टॉप 80-100 कॉस्प्लेअर्सची निवड केली जाईल आणि त्यांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
  3. वेव्हज 2025 मध्ये प्रत्यक्ष स्पर्धा - अंतिम फेरीतील स्पर्धक पूर्ण कॉस्प्लेमध्ये रॅम्पवर चालतील आणि आपली सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित करतील.
  4. ज्युरी कडून मूल्यांकन आणि विजेत्यांची घोषणा - प्रमुख निवड मानांकनाच्या आधारे विविध श्रेणीतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल.

प्रमुख तारखा

  • ● नोंदणी सुरू: 28 मार्च 2025
  • नाव नोंदणीची अंतिम तारीख: 7 एप्रिल 2025
  • वेव्हज कॉस्प्ले चॅम्पियनशिप ग्रँड फिनाले: 1 मे - 4 मे 2025

अधिक तपशील आणि नोंदणी माहितीसाठी, https://creatorsstreet.in/ ला भेट द्या. नोंदणी लिंक https://forms.office.com/r/xpeg7sDASm

WAVES बद्दल अधिक माहिती:

प्रसार माध्यम आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड असलेली पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES) भारत सरकारने 1 ते 4 मे 2025 दरम्यान महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आयोजित केली आहे.

तुम्ही उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माता किंवा नवोन्मेषक असाल, तर ही शिखर परिषद प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी तुम्ही जोडले जावे यासाठी, तुमचा सहयोग वाढवण्यासाठी तसेच नवोन्मेष घडवण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी जागतिक व्यासपीठ प्रदान करते.

WAVES भारताची सर्जनशील शक्ती वाढविण्यासाठी सज्ज आहे. तसेच आशय निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून आपले स्थान उंचावण्यासाठीही सज्ज आहे. केंद्रित उद्योग आणि क्षेत्रांमध्ये यांचा समावेश आहे - ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, समाज माध्यम व्यासपीठ, उत्पादक कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एक्सआर).

तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? त्यांची येथे उत्तरे शोधा

पीआयबी टीम वेव्हजच्या नवीनतम घोषणांसह अपडेट रहा. वेव्हजसाठी  आत्ताच  नोंदणी करा.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116805) Visitor Counter : 44