मंत्रिमंडळ
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्र सरकारचे 48.66 लाख कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
2 टक्के लाभामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 6614.04 कोटी रुपयांचा भार पडणार
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2025 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा (डीआर) निधीचा अतिरिक्त हप्ता 01.01.2025 पासून जारी करायला मंजुरी दिली. महागाईची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन /निवृत्तीवेतनच्या सध्याच्या 53% दरात ही 2% वाढ करण्यात आली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हींमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला एकूण 6614.04 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. केंद्र सरकारचे 48.66 लाख कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2116243)
आगंतुक पटल : 255
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam