गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून हुरियतच्या आणखी दोन गटांकडून फुटीरतावादाचा त्याग करण्याच्या निर्णयाचे स्वागत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या राष्ट्र उभारणीमध्ये या गटांनी दाखवलेल्या विश्वासाचेही केले स्वागत
मोदी सरकारच्या काळात फुटीरतावाद अखेरच्या घटका मोजत असून अवघ्या काश्मीरमध्ये एकतेचा नारा प्रतिध्वनित होत आहे
प्रविष्टि तिथि:
27 MAR 2025 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2025
हुरियत संघटनेशी संलग्न जम्मू आणि काश्मीर तहरीकी इस्तेक्बाल तसेच जम्मू आणि काश्मीर तहरीक-इ-इस्तिक्मात या दोन गटांनी फुटीरतावाद सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या उभारणीवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी स्वागत केले आहे. एक्स माध्यमावरील संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारच्या काळात फुटीरतावाद अखेरच्या घटका मोजत असून अवघ्या काश्मीरमध्ये एकतेचा नारा दुमदुमतो आहे.
* * *
S.Patil/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2115957)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Urdu
,
English
,
Nepali
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam