पंतप्रधान कार्यालय
सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पुरुष रिगू संघानचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2025 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2025
सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताला या स्पर्धेचे पहिले वहीले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दलही त्यांनी संघाचे कौतुक केले.
या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
सेपक टकरॉ विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाने प्रदर्शित केलेल्या अद्वितीय क्रीडा कौशल्याबद्दल संघाचे अभिनंदन! या संघाने भारताला एकूण 7 पदके जिंकून दिली. पुरुष रिगू संघाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
ही थक्क करणारी कामगिरी जागतिक सेपक टकरॉ खेळातल्या भारताच्या आशादायी भविष्याचेच निदर्शक आहे.
* * *
S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2115534)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada