पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राममनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 23 MAR 2025 9:02AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राममनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. ते एक  दूरदर्शी नेते, प्रखर स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले आहे.

या संदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश ;

राममनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो. ते एक दूरदर्शी नेते, प्रखर स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. त्यांनी वंचितांचे सक्षमीकरण करण्यासाठी  आणि बलशाली भारताच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले.

 

****

NM/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2114120) आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam