माहिती आणि प्रसारण मंत्रालय
संगीत स्पर्धा संकल्पना
Posted On:
13 MAR 2025 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2025
संगीत स्पर्धा या संकल्पनेतून भारताच्या अस्सल संगीत भावविश्वाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत गीतकार, गायक, कलाकार आणि संगीतविशारदांना संगीतातील अशी एखादी बंदिश सादर करायची आहे ज्यातून भारतीय शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय आणि समकालीन संगीताचा अनोख्या मिलाफाचे प्रतिबिंब उमटेल. संगीत स्पर्धा संकल्पना हा उपक्रम जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, वेव्हज अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग आहे.

पहिल्याच वर्षीची जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) एक अनोखे केंद्र तसेच संपूर्ण माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) क्षेत्राच्या एकत्रीकरणासाठी सज्ज असलेला मंच आहे. हा कार्यक्रम म्हणजे जागतिक एम आणि ई क्षेत्राचे लक्ष भारताकडे आकर्षित करून त्याला भारताच्या एम आणि ई क्षेत्रासोबत तसेच त्यातील प्रतिभावंतांसोबत जोडणे हे उद्दिष्ट असलेला प्रमुख जागतिक कार्यक्रम आहे.
मुंबई स्थित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे दिनांक 1 ते 4 मे 2025 या कालावधीत ही परिषद होणार आहे. प्रसारण आणि माहितीपूर्ण मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर, डिजिटल माध्यमे आणि नवोन्मेष तसेच चित्रपट या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित करुन वेव्हज हा कार्यक्रम भारताच्या मनोरंजन उद्योगाच्या भविष्याचे चित्र उभे करण्यासाठी प्रमुख व्यक्ती, सर्जक आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणेल.
स्पर्धेची संकल्पना " गीत भारताचे " ही असून त्यातून भारतीय संगीताचे सामर्थ्य आणि समृद्ध वारसा दिसून येतो. वेव्हज च्या प्रसारण आणि माहिती केंद्र या दुसऱ्या स्तंभाचा हा महत्वाचा घटक आहे. या स्पर्धेसाठी 178 अर्जदारांनी नोंदणी केली होती.
मार्गदर्शक तत्वे आणि नोंदणी प्रक्रिया :
यामध्ये केवळ भारतीय कलाकारांनाच प्रवेश घ्यायला अनुमती होती आणि या सर्वांनी सविस्तर प्रक्रियेतून जाऊन स्पर्धेच्या विशिष्ट नियमांचे पालन केले:
कार्याचे स्वरूप: सहभागी उमेदवारांनी त्यांच्या कलाकृती साहित्यिक, नाट्यमय, संगीतमय किंवा कलात्मक निर्मितीसह विविध स्वरूपात सादर केल्या. सांगीतिक रचना एक ते दोन मिनिटे इतक्या कालावधीच्या होत्या आणि ध्वनिमुद्रण MP3 किंवा WAV स्वरूपात (शक्यतो उच्च-गुणवत्तेच्या) ऑडिओ फाईल्स होत्या.
मूळ निर्मिती अर्थात निर्मितीची अस्सलता: कलाकृती अस्सल असावी आणि याआधी कुठेही प्रसिद्ध झालेली किंवा उपयोगात आणलेली नसावी. तसेच भारतीय कायद्याअंतर्गत कोणत्याही विद्यमान कॉपीराइटचे उल्लंघन करता कामा नये.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नसावा: केवळ मानव निर्मित आशयालाच परवानगी देण्यात आली होती आणि कृत्रिम बुध्दितमत्तेचा वापर (जनरेटिव्ह अल तंत्रज्ञानाचा) प्रतिबंधित होता.
सहभागींना परवानगी: सहभागींना केवळ एकच प्रवेश आणि एकच अर्ज करायला परवानगी होती. टीम मध्ये तीन सदस्यांना परवानगी असली तरी केवळ एकाच सदस्याने नोंदणी करुन आपल्या टीमचे प्रतिनिधित्व करण्यास परवानगी होती.
वयाची अट: फक्त 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती सहभागी होऊ शकत होत्या.
सर्जनशील प्रक्रिया व्हिडिओ: कलाकारांना त्यांच्या सादरीकरणासोबतच भारतीय शास्त्रीय संगीताचा गाभा केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्जनशील प्रक्रियेचा आणि सांस्कृतिक प्रेरणाचा प्रवास कथन करणारा एक लहान व्हिडीओ (कालावधी 2 मिनिटांपर्यंत) सादर करायचा होता.
स्पर्धेचा तपशील
या स्पर्धेत, गीतकार, गायक, कलाकार आणि संगीतकारांनी भारतीय शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय आणि समकालीन वाद्ये आणि शैलींच्या अनोख्या मिलाफातून प्रेरणा घेऊन संगीताचे सादरीकरण केले.
ही स्पर्धा दोन टप्प्यात झाली : प्राथमिक टप्पा आणि अंतिम टप्पा.
गीत भारताचे या स्पर्धेच्या संकल्पनेमुळे सहभागी झालेल्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि समकालीन शैली यांचा संगम साधून सादर केलेल्या कलाकृतींनी सुसंगत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध संगीत रचना निर्माण केली.
महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रमाच्या प्रमुख तारखा आणि वेळापत्रक येथे दिले आहे:

मूल्यमापनाचे निकष
संकल्पना संगीत स्पर्धेचे मूल्यांकन निकष एका संपूर्ण आणि निष्पक्ष मूल्यांकन प्रक्रियेनुसार आखण्यात आले होते. भारतीय संगीत उद्योगातील तज्ञांच्या पॅनेलने सादरीकरणाचे दोन टप्प्यात मूल्यांकन करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या अव्वल 6 जणांची निवड केली. अंतिम स्पर्धकांची निवड खालील निकषांवर करण्यात आली:

पारितोषिक आणि ओळख
स्पर्धेत एकूण सहा विजेत्यांची निवड करण्यात आली, ज्यात एक महा पारितोषिक विजेता आणि उपविजेते यांचा समावेश होता. बक्षिसांची माहिती:
भव्य पारितोषिक (1 विजेता):
- रोख बक्षीस किंवा पर्यायी बक्षीस
- व्यावसायिक ध्वनिमुद्रण आणि रचना तयार करणे
- प्रचारात्मक साहित्य आणि सोशल मीडियामध्ये सादरीकरण
- प्रसिद्ध संगीतकार किंवा संगीतकारासह मार्गदर्शन सत्र
- वेव्हज मध्ये निमंत्रण
उत्तेजनार्थ पारितोषिके (5 विजेते):
- रोख बक्षीस किंवा पर्यायी बक्षीस
- वेव्हज शिखर परिषदेच्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमावर ओळख
- वेव्हज मध्ये निमंत्रण
निष्कर्ष
वेव्हज कार्यक्रमाचा भाग असलेल्या संगीत स्पर्धा संकल्पना उपक्रमात भारताच्या समृद्ध वारशाचा उत्सव सादर करण्यात आला, तसेच सहभागींना भारतीय शास्त्रीय संगीतापासून प्रेरणा घेऊन अस्सल संगीताची निर्मिती करण्यासाठी चालना मिळाली. अतिशय प्रतिभावंत सहभागी आणि काटेकोर मूल्यांकन प्रक्रियेमुळे या स्पर्धेने वैविध्यपूर्ण प्रतिभेला एकत्र आणून भारतीय संगीताची खोली दाखवून दिली. या कार्यक्रमात भारताच्या मनोरंजन उद्योगाच्या भविष्यातील विजेत्यांच्या योगदानावर प्रकाश टाकून मार्गदर्शन आणि जागतिक मान्यता यासह आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
संदर्भ
Theme Music Competition
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111177)
Visitor Counter : 24