नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम सूर्यघर : मोफत वीज योजनेने ओलांडला दहा लाख जोडण्यांचा टप्पा

Posted On: 11 MAR 2025 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2025

 

पीएम सूर्यघर : मोफत वीज योजना या घराच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या जगातील सर्वात मोठ्या उपक्रमाने 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात 10.09 लाख जोडण्यांचा  एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी या महत्वाकांक्षी योजनेचे उदघाटन  केले. घराच्या छतावरील सौर प्रकल्पांद्वारे देशभरातील 1 कोटी निवासी कुटुंबांना मोफत वीज पुरवणे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून नागरिकांना ऊर्जा निर्माता बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाला 100 रोपांची लागवड केल्यानंतर जितके कार्बन उत्सर्जन कमी होईल तितके हवामान बदलाच्या धोक्याचे निवारण करण्याइतके योगदान लाभेल.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने  राबवलेल्या या योजनेसाठी  47.3 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 6.13 लाख लाभार्थ्यांना 4,770 कोटी रुपयांचे अनुदान यशस्वीरित्या मिळाले आहे. पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेत www.pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज भरणे, विक्रेत्याची निवड इत्यादी प्रक्रिया केली जाते आणि 15 दिवसांच्या आत अर्जदारांच्या बँक खात्यात अनुदान जमा होते. या योजनेला अनेक राज्यांमध्ये लक्षणीय यश मिळाले आहे. चंदीगड, दमण आणि दीव येथे सरकारी इमारतींच्या छतावरील 100 % सौर उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे, स्वच्छ ऊर्जा स्वीकारण्यात देश आघाडीवर आहे. महाराष्ट्र,  राजस्थान,  गुजरात आणि तामिळनाडू सारखी राज्ये देखील अपवादात्मकपणे चांगली कामगिरी करत आहेत, सौर पॅनल स्थापनेच्या एकूण आकडेवारीत त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

या योजनेची सुरळीत आणि वेळेवर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार, सर्व राज्यातील प्रगतीवर बारकाईनं लक्ष ठेवत आहे, वर्ष 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय केंद्र सरकार सरकारी इमारतींवर सौर पॅनल बसवायला प्रोत्साहन देत आहे. या प्रयत्नांमुळे ऊर्जा निर्मितीच्या कार्यान्वयन किंमतीत लक्षणीय घट होते.  शिवाय ही योजना वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रांसाठी एक मॉडेल म्हणून काम करते तसेच देशभरात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन मिळते.

***

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2110426) Visitor Counter : 31