पंतप्रधान कार्यालय
वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन,सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
04 MAR 2025 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 04 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जामनगर इथे वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले.अनंत अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या करुणापूर्ण प्रयत्नांबद्दल प्रशंसा करुन ते म्हणाले की,वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित आसऱ्याचे ठिकाण आहे. पर्यावरणाची शाश्वतता व वन्यजीवांच्या कल्याणालाही इथे प्रोत्साहन दिले जात आहे.
X या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे :
"वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले; जिथे प्राण्यांसाठी सुरक्षित आसऱ्यासह पर्यावरण शाश्वतता व वन्यजीव कल्याणालाही प्रोत्साहन दिले जात आहे. या खूपच ममतापूर्ण कामासाठी मी अनंत अंबानी व त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाची प्रशंसा करतो."
"वनतारासारखा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. पृथ्वीवरच्या आपल्यासोबत राहणाऱ्या सर्व जीवमात्रांचे संरक्षण करण्याच्या आपल्या शेकडो वर्षांपासूनच्या परंपरेचेच हे उत्साहवर्धक उदाहरण आहे.त्याचीच ही काही क्षणचित्रे..."
"माझ्या जामनगर इथल्या वनतारा भेटीदरम्यानची आणखी काही क्षणचित्रे."
N.Chitale/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108185)
Visitor Counter : 33
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada