पंतप्रधान कार्यालय
महिलांनी आपल्या प्रेरणादायी जीवनाचा प्रवास सामायिक करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रोत्साहनपर आवाहन
8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान स्वतःची समाज माध्यमांवरील खाती काही निवडक महिलांकडे करणार सुपूर्द
Posted On:
03 MAR 2025 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमूद केले की, नमो अॅप ओपन फोरमवर सामायिक करण्यात आलेले असंख्य जीवन प्रवास प्रेरणादायी आहेत. 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक महिलांना या दिवसासाठी आपले डिजिटल सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्याची संधी मिळेल अशी पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. अशा प्रकारचे प्रेरणादायी जीवनप्रवास अधिकाधिक सामायिक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मोदी यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:
"मी नमो अॅप ओपन फोरमवर खूप प्रेरणादायी जीवन प्रवास सामायिक होताना पाहत आहे, ज्यामधून 8 मार्च रोजी, महिला दिनी, माझ्या डिजिटल सोशल मीडिया अकाउंट्सच्या सोशल मीडिया टेकओव्हरसाठी काही महिलांची निवड केली जाईल. मी असे जीवन प्रवास आणखी सामायिक करण्याचा आग्रह करतो.”
N.Chitale/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107945)
Visitor Counter : 31