पंतप्रधान कार्यालय
काशी तमिळ संगममला प्रारंभ, काशी आणि तामिळनाडू यांच्यातील कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव, हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणतो: पंतप्रधान
काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
15 FEB 2025 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की काशी तमिळ संगमम सुरु झाला आहे. काशी आणि तामिळनाडू यांच्यादरम्यानच्या कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव असलेला हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणतो असे त्यांनी पुढे सांगितले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“काशी तमिळ संगमम सुरु झाला.....
काशी आणि तामिळनाडू यांच्यातील कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव असलेला हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणत आहे. हा उत्सव ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला देखील अधोरेखित करत आहे.
मी तुम्हा सर्वांना काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे!
@KTSangamam”
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103699)
Visitor Counter : 30
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam