पंतप्रधान कार्यालय
केंद्रातील व आसाममधील रालोआ सरकार बोडो समाजाच्या सक्षमीकरणासाठी आणि आकांक्षापूर्तीसाठी अथकपणे काम करत आहे, हे काम पुढेही आणखी जोमाने सुरू राहील - पंतप्रधान
Posted On:
15 FEB 2025 4:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 फेब्रुवारी रोजी कोक्राझार इथे होणाऱ्या एक दिवसाच्या विशेष विधानसभा अधिवेशनाची प्रशंसा केली आहे.
मोदी म्हणाले की, केंद्रातील आणि आसाम राज्यातील रालोआ सरकार बोडो समाजाचे सक्षमीकरण आणि आकांक्षापूर्तीसाठी अथकपणे काम करत आहे. हे काम यापुढेही आणखी जोमाने सुरू राहील.
आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांच्या एक्स या समाजमाध्मावरील, विधानसभेच्या एका दिवसाच्या विशेष अधिवेशनाबाबतच्या घोषणेला प्रतिसाद देताना मोदी म्हणतात,
“केंद्रातील आणि आसाम राज्यातील रालोआ सरकार बोडो समाजाचे सक्षमीकरण आणि आकांक्षापूर्तीसाठी अथकपणे काम करत आहे. हे काम यापुढेही आणखी जोमाने सुरू राहील.
मला माझी कोक्राझारला दिलेली भेट आठवते. या भेटीत मी उत्साही बोडो संस्कृती अनुभवली होती.”
***
S.Kane/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103539)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam