माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज एक्सप्लोरर चॅलेंज
Posted On:
14 FEB 2025 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025
भारताची चैतन्यमयी कथन क्षमता जागतिक पटलावर आणण्याचा प्रयत्न
प्रास्ताविक
वेव्हज एक्सप्लोरर चॅलेंज ही क्रिएटर्स आणि स्टोरीटेलर्सना यूट्युब शॉर्ट्सच्या माध्यमातून भारताविषयीचा आपला दृष्टिकोन सादर करण्याची उत्तम संधी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने आयोजित केलेला हा उपक्रम सहभागींना देशातील चैतन्यशील रस्ते, सांस्कृतिक वारसा, निसर्गरम्य देखावे आणि आतापर्यंत अनभिज्ञ असलेला ठेवा टिपण्यासाठी आमंत्रित करतो. स्पर्धेची संकल्पना 'फॉर द रेकॉर्ड, धिस इज माय इंडिया' अशी असून भारताची विविधता, अस्सलता आणि सर्जनशीलता प्रकाशात आणणाऱ्या कथनात आपला वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्यासाठी वेव्हज एक्सप्लोरर चॅलेंज,क्रिएटर्सना प्रोत्साहित करत आहे.

हे चॅलेंज,वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट (वेव्ह्ज) अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, या अंतर्गत प्रमुख उपक्रम असलेल्या 'क्रिएट इन इन इंडिया चॅलेंजेस'चा एक भाग असून त्याचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होणार आहे.उद्योग धुरीण, निर्माते आणि नवोन्मेषकांना एकत्र आणून, वेव्हज भारताच्या सर्जनशील क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून काम करताना उदयोन्मुख कल, संधी आणि आव्हानांवर चर्चा करेल.
वेव्हजच्या केंद्रस्थानी असलेल्या क्रिएट इन इन इंडिया चॅलेंजेस'ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जगभरातून 70,000 हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रेरणा देण्यासाठी आखलेला हा उपक्रम कथाकारांना सीमा ओलांडण्यास आणि आशय निर्मितीची पुनर्परिभाषा करण्यास सक्षम करतो. आतापर्यंत सुरू केलेल्या 31 चॅलेंजेसपैकी 22 चॅलेंजेसमध्ये जागतिक सहभाग नोंदवला गेला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रम म्हणून, ही आव्हाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी गतिमान केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करत आहेत.
नियम आणि मार्गदर्शक सूचना
व्लॉग : कमाल कालावधी 7 मिनिटे
शॉर्ट फॉर्म व्हिडिओ : कमाल कालावधी 1 मिनिट ( दीर्घ व्लॉग्समधून केलेले शॉर्ट फॉर्म व्हिडिओदेखील पात्र असतील. )
स्पर्धेची अंतिम मुदत 15 मार्च 2025 आहे.
सर्व आशय मूळ स्वरूपात असावा आणि खास वेव्हज एक्सपलोरर चॅलेंजसाठी तयार केलेला असावा.
व्हिडिओमध्ये दर्शविण्यात आलेली ठिकाणे भारतातलीच असावी.
सहभागी व्यक्ती 18 वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक वयाची असावी.
प्रवेशिका यूट्यूबवर पब्लिश होणे आवश्यक आहे.
व्लॉग्स आणि शॉर्ट फॉर्म व्हिडिओज इंग्रजी किंवा अन्य भारतीय भाषेत करता येतील.
तुमच्या युट्यूब चॅनेलवर तुमचा व्लॉग किंवा युट्यूब शॉर्ट्स सबमिट, अपलोड करताना #WavesExplorer समाविष्ट करा आणि इव्हेंटचे अधिकृत अकाऊंट टॅग करा.
सर्व सादरीकरण पात्र ठरण्यासाठी युट्यूबच्या कम्युनिटी मार्गदर्शक सूचनांच्या अनुपालनाची पूर्ती करणारे असावे.
पुरस्कार आणि कौतुक
विजेत्यांना 2025 साठी युट्यूबद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळेल
वेव्हज 2025 कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सर्व खर्च पेलला जाईल.
विजेत्यांच्या प्रवेशिका कार्यक्रमात 'वेव्हज हॉल ऑफ फेम' मध्ये दर्शविण्यात येतील.
सादरीकरण अर्जाच्या माध्यमातून तुमच्या प्रवेशिका येथे सादर करा
संदर्भ :
https://wavesindia.org/challenges-2025
https://eventsites.iamai.in/Waves/explorer/
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2103312)
Visitor Counter : 33